शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

थकीत भाड्याबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: August 31, 2014 23:35 IST

शहरवासीयांत उत्सुकता : या प्रश्नावर विरोधक काय करणार

चिपळूण : नगरपरिषद हद्दीतील कन्याशाळा, पाग मुलांची शाळा, पेठमाप मराठी उर्दू शाळा, चिंचनाका नं. १ या शाळा जिल्हा परिषदेला भाडेत्तत्वावर देण्यात आल्या आहेत. मात्र, मार्चअखेर या शाळांचे २२ लाख ७६ हजार ३७१ रुपये थकीत भाडे असल्याने हे भाडे वसूल कसे करता येईल, याबाबतच्या प्रस्तावावर उद्या (सोमवारी) होणाऱ्या विशेष सभेत चर्चा होणार आहे. यासंदर्भात सत्ताधारी व विरोधक कोणती भूमिका घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात सायंकाळी ४ वाजता नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होणार आहे. या सभेमध्ये विविध ३४ विषयांवर चर्चा होणार आहे. नगर परिषद हद्दीतील स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीसाठी २०१४-१५ या वर्षाकरिता ६ विद्युत कर्मचारी ठेकेदार पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याबाबत अंदाजपत्रकीय दरापेक्षा ८.९८ टक्के जादा दराच्या निविदेस आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नगरपरिषद हद्दीतील खेंड, बाजारपेठ, उक्ताड, पेठमाप, गोवळकोट येथील घनकचरा व्यवस्थापन सेवा पुरविण्याचे काम तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येते. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, निधी शिल्लक नसल्याने ७६ लाख ७६ हजार ७६० रुपये खर्चास नगर परिषद फंडातून प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्याबाबत आलेल्या रिपोर्टवर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६चे चौपदरीकरण केले जाणार आहे. नगरपरिषद हद्दीतून हा रस्ता जात असल्याने यासंदर्भात सहायक मिळकत व्यवस्थापक यांच्या रिपोर्टमधील नमूद बाबींवर या सभेत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. प्रभाक क्र. १ मधील शंकरवाडी येथे गणेशघाट येथील पाखाडीचे काम करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ३ लाख ७ हजार ५२० रुपयांचा खर्च मागासवर्गीय विशेष कल्याण समिती निधीतून करण्याचा ठराव करण्यात आला असून, या खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. गोवळकोट भागामध्ये बायपास येथे बांधलेल्या नवीन टाकीतून पाण्याचे वितरण करण्यासाठी एन्रॉन ब्रीज (करंजेश्वरी कमानी) पर्यंत ३०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांच्याकडून कामाचे अंदाजपत्रक करुन घेण्यात आले आहे. यासाठी येणाऱ्या १ कोटी ८१ लाख ३८ हजार २९० रुपये खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेतली जाणार आहे. शहरातील नवीन बाजारपुलाचे काम सुरु करण्यात येणार असल्याने जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणाऱ्या ६ लाख २५ हजार २७८ च्या खर्चास प्रशासकीय आर्थिक मंजुरी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे गोवळकोट येथील ३०० एमएम १५० मीटर व्यासाची पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यासाठी १० लाख ३७ हजार ४०२ रुपयास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. ( वार्ताहर)