शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 28, 2016 00:26 IST

संगमेश्वर तालुका : कार्यकर्त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू, पक्षांतराची पसरली साथ

सचिन मोहिते --देवरुख --जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची चाहुल सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबुतीकरिता राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. याच काळात कार्यकर्त्यांची तळ्यात-मळ्यात उड्या मारायला सुरुवात होते. याची प्रचिती गेल्या महिन्यात संगमेश्वरवासीयांना आली. संगमेश्वर तालुका शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. मात्र, त्याला आता भाजपकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गेल्या निवडणुकात तसेच अन्य निवडणुकांत सेना आणि भाजप अशी युतीत असलेले दोन्ही पक्ष आता आपली वेगळी ताकद निर्माण करायला निघाले आहेत आणि म्हणूनच स्वतंत्र लढण्याची उर्मी हे पक्ष बाळगत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच देवरुखच्या नगरपंचायत निवडणुकीतदेखील युती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र, नगरपंचायतीमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीनंतर देवरुखात भाजपने राष्ट्रवादीला जवळ करुन सेनेला सत्तेपासून वंचित ठेवल्याचे दिसून आले. म्हणजेच भाजप आता सेनेपासून दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.तालुक्यात गत काही महिन्यात राजकीय घडामोडी पाहता कार्यकर्त्यांची तळ्यात - मळ्यात होणारी स्थिती दिसून आली आहे. सूर्यकांत साळुंखे यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतून निवडणूक लढविली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा जिल्हा परिषद गटाला त्यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. कसबा जिल्हा परिषद गट आणि पंचक्रोशीतील काही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश करुन घेण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्याचा परिणाम ऐन निवडणुकीत कसा होतो, हे येत्या ४ महिन्यात दिसून येणार आहे.सध्या भाजपने पक्षवाढीसाठी विशेषत्वाने कार्यक्रम राबविल्याचे दिसून येत आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी गणेशोत्सवापूर्वी संगमेश्वर तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय कार्यकर्त्यांच्या कॉर्नर सभा, कार्यकर्ता मेळावा घेऊन विशेष प्रयत्न केले. तसेच युवकांवर जबाबदाऱ्या देत त्यांना महत्त्वाची पदे देऊन युवकांचा मोठा सहभाग वाढवित आहेत.तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांचा मागोवा घेतल्यास असे स्पष्ट झाले आहे की, शिवसेनेतून मातब्बर नेते अन्य पक्षात गेले. मात्र, तालुक्यात सेनेवर तसा काहीच परिणाम होत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे सध्या नव्याने भाजपमध्ये प्रवेशलेले सूर्यकांत साळुंखे यांचा प्रभाव आगामी निवडणुकात कसा पडतो, ते स्पष्ट होईल. काही कार्यकर्ते सेनेतून भाजपमध्ये गेले असले तरी सेनेवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.समाजहितासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. आंदोलन असो वा मोर्चे, यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे निवडणुकीत निवडून येण्याइतपत ताकद मनसेमध्ये नसली तरी समोरच्या उमेदवारांच्या मतांचे विभाजन करुन त्याला पराभूत करण्यास हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.