शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

कोरोनामुळे भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून त्यासाठी लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोविड नियम, अटी मोडणाऱ्यांविरोधात प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उचलला. मात्र, कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टायर रिमोल्डिंग बंद

देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ६ वर्षांपासूनची मागणी मंडळासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याबद्दल कोसुंब ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

कासवांची ३३ घरटी संरक्षित

दापोली : मुरूड समुद्रकिनारी कासवाच्या पिलांचे नुकतेच जलार्पण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ५५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. दरवर्षी मुरुडमध्ये ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडतात. येथील कासवमित्र ज्ञानेश्वर माने व सहकारी राजेश शिगवण यांनी कासवाची ३३ घरटी संरक्षित केली आहेत.

विशेष रेल्वेला मुदतवाढ

खेड : शिमगोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन, चार फेस्टिव्हल सुपरफास्ट स्पेशल गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दोन फेस्टिव्हल स्पेशल ३१ मार्चपासून व अन्य २ स्पेशल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून धावणार आहेत.

कारवाईची मागणी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरुख-संगमेश्वर या रस्त्याच्या कामात घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राज्य सरकार आणि विरोधी पक्षाकडे केली आहे.

कुंबळे गावचे कौतुक

मंडणगड : प्रशासनाच्या मदतीने अतिशय उत्तम, सांघिक कार्य करत अत्यंत लोकोपयोगी काम कुंबळे ग्रामीण बाजार व कुंबळे ग्रामपंचायतीने नवीन कार्यालयाच्या रूपाने साकारले आहे. हे काम लोकोपयोगी असल्याने दोन्ही उपक्रमांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी कौतुक केले आहे.

अखेर ग्रामस्थ जिंकले

राजापूर : तालुक्यातील कशेळी फोडकरवाडी नळपाणी योजनेचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात आला आहे. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकवर्गणी देण्याचा निर्णय देण्यात आला आहेे. कशेळी ग्रामपंचायत हद्दीतील फोडकरवाडी येथे १४ वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती.