शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत एटीएमची तोडफोड

By admin | Updated: December 16, 2014 23:46 IST

तीन लाखांची हानी : अज्ञाताच्या कृत्याने खळबळ

रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या मिरकरवाडा भागातील बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम कक्षाची अज्ञाताकडून तोडफोड झाल्याचे आज (मंगळवार) सकाळी ९ वाजता उघड झाले. यामुळे तीन लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद या सेंटरची देखभाल करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट अ‍ॅण्ड सर्व्हिस प्रा. लि.चे कर्मचारी अंशुल विलास पिलणकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी रात्री ११ नंतर ते १६ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ९ या वेळेत हा प्रकार घडला आहे. मिरकरवाडा येथे बॅँक आॅफ इंडियाचा एटीएम कक्ष तेथील रहीम करीम अकबर अली यांच्या घराच्या शेडमध्ये उभारण्यात आला आहे. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास या कक्षात तोडफोड झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना तसेच या सेंटरची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी एटीएम सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराचे हॅँडल तोडलेले दिसून आले.तसेच आतील छत, लाईट फिटिंग, एटीएम मशिनच्या युपीएस व बॅटरीचे नुकसान केले आहे. चोरट्याला एटीएम मशीन फोडण्यात यश आले नाही.याबाबत पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही दिवसात एटीएममधून चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)एटीएम सुरक्षा गंभीर विषय...रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील एटीएम सेंटर्स किती सुरक्षित आहेत, तेथे सुरक्षारक्षक असतो काय, असेल तर संशयास्पद व्यक्तीकडे त्याचे किती लक्ष असते, याबाबत वर्षभरापूर्वीच ‘लोकमत’च्या टीमने मध्यरात्री स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यावेळी धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षक होते. परंतु त्यातील काहीजण झोपा काढत होते, तर काही सेंटर्सवर सुरक्षारक्षकच नव्हते. त्यामुळे एटीएम सेंटर्सची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचे उघड झाले होते. अजूनही या सेंटर्सची सुरक्षा राम भरोसे असल्याची स्थिती आहे. गेल्याच पंधरवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील माणगाव येथेही एटीएम कक्षातील एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. त्यामुळे या सेंटर्सची सुरक्षा हा भविष्यातील गंभीर विषय बनू पाहात आहे.फूटेजकडे लक्षया एटीएम कक्षात सी. सी. टी. व्ही. कॅमेरा बसवण्यात आला आहे. मात्र, त्यासंबंधी देखभाल करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी रत्नागिरीत आल्यावर रेकॉर्डिंगची तपासणी होईल व त्यात कृत्य कोणी केले हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सी. सी. टी. व्ही. फूटेजकडे लक्ष लागले आहे.