शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या मालमत्ता होणार जप्त

By admin | Updated: March 2, 2016 23:58 IST

रत्नागिरी नगर परिषद : पालिका प्रशासन राबविणार धडक मोहीम

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदने घरफाळा थकबाकीप्रश्नी बजावलेल्या लाल कार्डचा धसका थकबाकीदारांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात करवसुलीत ७ टक्क्यांनी वाढ झाली असून, यातून ४० लाखांची वसुली झाली आहे. मंगळवारपासून शहरात पालिकेचे जप्ती मोहिमेचे वाहन फिरू लागले असून, थकबाकी न भरल्यास येत्या दोन दिवसात काही मालमत्ता जप्त केल्या जाणार असल्याचे संकेत पालिकेच्या करवसुली विभागाने दिले आहेत. आठवडाभरापूर्वी रत्नागिरी पालिकेने घरफाळा थकबाकी असलेल्या हजारपेक्षा अधिक थकबाकीदारांना पोस्टाने जप्तीच्या नोटीस पाठविल्या होत्या. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक थकबाकीदारांनी पालिकेत येऊन आपला कर जमा केला आहे. त्यामुळेच गेल्या आठवडाभरात सुमारे ४० लाखांचा करभरणा झाला आहे. मात्र, ज्यांनी लाल कार्डनुसार थकबाकी भरलेली नाही, त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई येत्या दोन दिवसात केली जाणार आहे.करवसुली विभागाचे जप्ती वाहन मंगळवारपासून शहराच्या विविध भागात फिरत असून, ध्वनीक्षेपकाद्वारे जप्ती मोहिमेबाबत थकबाकीदारांना सावध केले जात आहे. दोन दिवसात काही मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचे संकेतही सूत्रांनी दिले आहेत. तसेच आणखी हजार थकबाकीदारांना लाल कार्ड बजावली जाणार आहेत. त्यामुळे लाल कार्ड बजावलेल्यांची संख्या दोन हजारवर पोहोचणार आहे. रत्नागिरी शहरात २४ हजार २८८ करपात्र मालमत्ता आहेत. या मालमत्तांपोटी ६ कोटी ७३ लाख ८३ हजार वार्षिक करमागणी आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी असलेल्या या करमागणी रकमेपैकी ३ कोटी ६ लाख ६७ हजार रुपये अर्थात ४५ टक्के करवसुली गेल्या आठवडाभरापूर्वी झाली होती. त्यानंतर पालिकेने लाल कार्ड बजावल्याने व करवसुली मोहिमेमुळे त्यात ७ टक्क्यांनी वाढ होऊन मंगळवारपर्यंत ही वसुली ५२ टक्क्यांवर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)कायदेशीर कारवाई : दहा मालमत्ताधारक अजूनही ढिम्मचगेल्यावर्षी रत्नागिरी पालिकेने थकबाकीमुळे मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यातील १० मालमत्ताधारकांनी अद्यापही थकबाकी भरलेली नाही. थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही रत्नागिरी नगर परिषदेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.