हातखंबा : रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ. अस्मिता मजगावकर यांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणविस्तार अधिकारीपदी पदाेन्नती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा झरेवाडी केंद्रातर्फे गाैरव करण्यात आला.
यावेळी झरेवाडी केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख प्रभाकर खानविलकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कळंबटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सनगरे, झरेवाडी केंद्रातले सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. झरेवाडी केंद्रशाळेचे शिक्षक राजेश गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मजगावकर यांनी यशस्वी होण्यासाठी कोणत्या सूत्राचा उपयोग आपल्या जीवनात केला पाहिजे, जेणेकरून यशाचे शिखर पादाक्रांत करण्यास कोणती अडचण येणार नाही, हे सांगितले. कष्ट हेच माझ्या यशाचे मूल सूत्र असून, आपल्या मेहनतीवर सर्वांना विश्वास पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.