शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘आशां’च्या प्रश्नांसाठी आरोग्यमंत्र्यांशीही भांडू

By admin | Updated: March 16, 2016 23:55 IST

तुकाराम गोलमडे : आनंदीबाई जोशी पुरस्काराचे रत्नागिरी वितरण

रत्नागिरी : वेळ आल्यास आशांसाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशीही भांडू, असा इशारा शासनाला देत देशात महागाई आहे, तर आशातार्इंना महागाई नाही का? याचा विचार शासनाने करावा, असे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी व उत्कृष्ट आशा पुरस्कार वितरणाच्या वेळी काढले. देशातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार योजना जाहीर करण्यात आलेली होती. चिपळूण तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावून २५००० रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले. मंडणगड तालुक्यातील कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय क्रमांकाचे १५००० रुपयांचे, तर लांजा तालुक्यातील भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राने तृतीय क्रमांकाचे १०००० रुपयांचे रोख बक्षीस पटकावले.उत्कृष्ट उपकेंद्रांमध्ये प्रथम क्रमांक - मंडणगड तालुक्यातील आंबडवे उपकेंद्राला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - चिपळूण तालुक्यातील कळंबट उपकेंद्राला १०००० रुपये, तृतीय क्रमांक - लांजा तालुक्यातील मठ उपकेंद्राला ५००० रुपये, तर ग्रामीण रुग्णालयाचा मान दापोली उपजिल्हा रुग्णालय ५०,००० रुपये बक्षीसपास पात्र ठरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८० आशा कार्यकर्त्या यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे, जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती देवयानी झापडेकर, समाजकल्याण समिती सभापती शीतल जाधव, सदस्य उदय बने, विजय सालीम, अजय बिरवटकर, लांजा पंचायत समिती सभापती लीला घडशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब आरसुळकर, जिल्हा परिषद सदस्या विनया गावडे, अस्मिता केंद्रे, सुजाता तांबे, प्रणिता देवरुखकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, जिल्हा माध्यम अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आनंदा चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आरोग्य विभागाच्या कार्याबाबत तसेच आशा कार्यकर्ती यांच्या कामाबाबत गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजीत कांबळे व बेबीनंदा खामकर यांनी मेहनत केली. (शहर वार्ताहर)