शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:50 IST

रत्नागिरी येथील आर्ट सर्कल संस्थेचा ह्यथिबा राजवाडा संगीत महोत्सवह्ण दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या महोत्सवाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाबाबतची माहिती आर्ट सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआर्ट सर्कलचा संगीत महोत्सव २४ जानेवारीपासूनदिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव रंगणार

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल संस्थेचा ह्यथिबा राजवाडा संगीत महोत्सवह्ण दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या महोत्सवाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाबाबतची माहिती आर्ट सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.श्रुती सडोलीकर - काटकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर या कलाकारांच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव रंगणार आहे. २४ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम् नृत्य कीर्तनाने होणार आहे.

यावेळी सरस्वती सुब्रमण्यम या गायनसाथ, अतुल शर्मा हे बासरीसाथ तर सतीश कृष्णमूर्ती मृदुंगसाथ करणार आहेत. त्यानंतर श्रुती सडोलीकर - काटकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना अजय जोगळेकर हे संवादिनीसाथ, तर मंगेश मुळ्ये तबलासाथ करणार आहेत.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी रोजी युवा गायिका मुग्धा वैशंपायन यांचे गायन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध वादक अनंत जोशी हे संवादिनीसाथ, तर स्वप्नील भिसे हे तबलासाथ करणार आहेत. त्यानंतर संतूर वादक संदीप चॅटर्जी, बासरी वादक संतोष संत, तबला वादक पं. रामदास पळसुले आणि पखवाज वादक पंडित भवानीशंकर यांची जुगलबंदी रंगणार आहे.महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता ह्यस्त्री ताल तरंग लय राग समर्पणह्ण हा कार्यक्रम रसिकांचे आकर्षण ठरणार आहे. घटमसारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल या घटतरंग सादर करणार आहेत. कोलकाता संगीत रिसर्च अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पंडित उल्हास कशाळकर हे महोत्सवाचा समारोप करणार आहेत. 

टॅग्स :artकलाRatnagiriरत्नागिरी