शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंदिरला होणार नगर परिषदेचे सुसज्ज कोविड केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरी नगर परिषदेतर्फेे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरी नगर परिषदेतर्फेे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत ते नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. शहरातील आरोग्य मंदिर येथील नगर परिषद दवाखान्यात हे केंद्र सुरू केले जाणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी चर्चा करून हे कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात रुग्णसंख्या चौपट होण्याची भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली होती. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नगर परिषदेतर्फेे कोरोना केंद्र सुरू निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात अद्ययावत कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी बेडची सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम, औषधसाठा, रुग्णवाहिका, रुग्णांसाठी जेवण, नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत नियोजन सुरू आहे. नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी त्यासाठी विशेष प्रयत्न करीत असून तातडीने कोविड केंद्र रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शुक्रवारी नगर परिषद कर्मचाऱ्यांतर्फे या रुग्णालयाची साफसफाई करण्यात आली. पाण्याची, विजेची सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. येथे तीस बेड उपलब्ध आहेत. तेथे सेवा देण्याबाबत खासगी डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. नर्सेस, वॉर्डबॉय, आरोग्य कर्मचारी याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

..................

कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे नगर परिषदेच्या रुग्णालयात सुसज्ज कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक सुविधांची उपलब्धता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत कोरोना केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी.