शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टाळी एका हाताने वाजत नाही - अनंत गीते यांचा भाजपाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:19 IST

युती तुटल्याने जे घडलेय ते घडलेय. ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे.

ठळक मुद्दे ठाकरे जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्यच आहे व असेल, असे सांगत ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत का, या प्रश्नाचे उत्तर देणे गीते यांनी टाळले.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीआधी दिलेले समान सत्ता वाटपाचे वचन भाजपने पाळले नाही. त्यामुळेच शिवसेनेला वेगळ्या वाटेने जावे लागत आहे. भाजपने वचन पाळले असते तर ही वेळ आली नसती. त्यामुळे आता टीका करून काही उपयोग नाही. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाजपला येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झालेली असताना कॉँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा टोकाचा निर्णय योग्य आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आजच्या महाराष्ट्राची गरज लक्षात घेता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील. युती तुटल्याने जे घडलेय ते घडलेय. ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे. त्यामुळे प्रयोग नवीन वाटला तरी यशस्वी होऊ शकतो, असे गीते म्हणाले.भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला, हे योग्य वाटते का, असे विचारता गीते म्हणाले, भाजपला काय वाटते, हा भाजपचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. माझ्या संघटनेच्या संदर्भात मी भूमिका मांडणे योग्य आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही सरकारमध्ये होतो. त्यावेळी वाद झाले असले तरी त्यावेळची स्थिती आणि आताची स्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे.सदाचाराचा पराभवमाझा यावेळी रायगड मतदारसंघातून पराभव झाला, याला नेमकी काय कारणे आहेत, स्वकियांमुळे पराभव झाला का, यावर बोलताना गीते म्हणाले की, पराभव हा पराभवच असतो. तो मी मान्य केला आहे. मात्र, हा पराभव सदाचाराचा आहे व भ्रष्टाचाराचा विजय झाला आहे, असा टोलाही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता लगावला.मुख्यमंत्रीपदाबाबत मौनमहाविकास आघाडीची सत्ता येत असताना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी शिवसैनिक करीत आहेत. आपले काय मत आहे. आपला त्यांना पाठिंबा आहे का, याबाबत विचारता शिवसेनेत आदेश चालतो. शिवसेना शिस्तबध्द पक्ष आहे. त्यामुळे निवडून आलेल्या शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुखांनाच सर्वाधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे ठाकरे जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्यच आहे व असेल, असे सांगत ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत का, या प्रश्नाचे उत्तर देणे गीते यांनी टाळले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी