शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

विवाह नोंदणीबाबत दिसते आहे जागरूकता!

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

चिपळूण : १ हजार २२३ जणांकडून विवाह नोंदणी

चिपळूण : भटजीसमोर केलेला विवाह सरकार दरबारी काहीवेळा ग्राह्य धरला जात नाही. शासनाच्या आदेशानुसार विवाह नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, नगर परिषद हद्दीत सन २००८पासून आतापर्यंत १ हजार २२३ जणांनी विवाह नोंदणी केली आहे. पूर्वीच्या काळी विवाह हे भटजींच्या समोरच केले जात असत. मात्र, शासकीय पातळीवर या विवाहांना मान्यता मिळावी, यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात नोंद करणे बंधनकारक केले आहे. शासनस्तरावरून २००८पासून विवाह नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विवाह झाल्यानंतर ठराविक मुदतीत याची नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी नगर परिषद कार्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. ५ मे २००८ पासून खऱ्या अर्थाने विवाह नोंदणीला प्रारंभ सुरु झाला. यावेळी ४० जणांनी विवाह नोंदणी केली होती. विवाह नोंदणी करणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याची जाणीव नवदाम्पत्य व त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाल्याने आता या विवाह नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २००९मध्ये १३९, सन २०१०मध्ये १४५, सन २०११मध्ये १५५, सन २०१२मध्ये १५०, सन २०१३मध्ये २०८, सन २०१४मध्ये २०१ तर दि. १४ सप्टेंबर २०१५पर्यंत १८५ असे एकूण १ हजार २२३ जणांनी विवाह नोंदणी केली आहे. (वार्ताहर)विवाह केल्यानंतर त्याची सरकार दरबारी नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी २००८पासून नगर परिषद हद्दीत विवाह नोंदणी सुरू करण्यात आली आहे.