शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सोहमच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

By admin | Updated: July 15, 2014 23:43 IST

ब्रेनट्यूमर झाल्याने संकट

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील सोहम हरिश्चंद्र देवळेकर (११) या शाळकरी मुलाला ब्रेनट्यूमर झाला आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे सोहमवर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन देवळेकर कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.सोहम इयत्ता पाचवीत शिकत आहे. मात्र, त्याला दोन महिन्यांपूर्वी त्रास जाणवू लागल्याने घरच्या मंडळींनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सोहमला ब्रेनट्यूमर झाल्याचे निदान केले होते. या आजारासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकच पर्याय असतो. पण, शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सोहम याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. रोज परिस्थितीशी संघर्ष करून जगणाऱ्या देवळेकर कुटुंबाने जिद्दीने सोहमला शिकवण्याचे ठरवले असतानाच त्याच्यावर गंभीर आजाराची आफत ओढवली आहे. त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ४ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोहमवर सध्या तेथेच उपचार सुरु आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च देवळेकर कुटुंबाला परवडणारा नाही. समाजातील दानशूर मंडळींनी आर्थिक मदत करावी, यासाठी ८६५२१४२११३ या मोबाईलवर संपर्क साधावा किंवा बॉम्बे हॉस्पिटलच्या नावे मदत द्यावी, असे आवाहन देवळेकर यांनी केले आहे. (वार्ताहर)