शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनुजा सावंत ‘ज्युनिअर स्ट्राँग गर्ल’

By admin | Updated: November 6, 2016 00:42 IST

वेटलिफ्टींग स्पर्धा : प्रथमेश पावसकर ‘ज्युनिअर स्ट्राँग मॅन आॅफ रत्नागिरी’

रत्नागिरी : जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धेत अनुजा सावंत हिने एकूण ११३ किलो वजन उचलून युथ व ज्युनिअर गटाचा ‘स्ट्राँग गर्ल आॅफ रत्नागिरी’ हा पुरस्कार पटकावला. तसेच जिल्हास्तरीय ज्युनिअर पुरुष गटात प्रथमेश पावसकर याने एकूण १८० किलो वजन उचलून सुवर्ण पदकासह ‘ज्युनिअर स्ट्राँग मॅन आॅफ रत्नागिरी’ पुरस्कार पटकावला. राज्य स्पर्धेच्या अनुषंगाने नुकत्याच झोरेज् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी येथे पार पडलेल्या १२ वी युथ व १६ वी ज्युनिअर मुले, मुली जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा निवड चाचणी रत्नागिरीत पार पडली. यामध्ये अनुजा सावंत हिने जिल्हास्तरीय युथ व ज्युनिअर महिलांच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून चमकदार कामगिरी केली.या जिल्हास्तरीय स्पर्धा रत्नागिरी वेटलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालये तसेच संस्थांचे खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हा युथ स्पर्धेत (मुली) ४४ किलो वजनगट - दीप्ती वेदरे (करबुडे हायस्कूल, रत्नागिरी) सुवर्ण, प्राची सुपल (शिर्के हायस्कूल) रौप्य, ५३ किलो वजनगट - ऋतुजा आग्रे (करबुडे हायस्कूल) सुवर्ण, ५८ किलो वजनगट - सुप्रिया देसाई (विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय) सुवर्ण, ७५ किलो वजनगट - अनुजा सावंत (ज्युनिअर कॉलेज, पाली) सुवर्ण पदकाची कमाई केली.जिल्हा ज्युनिअर महिला ४८ किलो वजनगट - धनश्री शेलार (नवनिर्माण वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) सुवर्ण, ७५ किलो वजनगट - अनुजा सावंत (कनिषठ महाविद्यालय, पाली) सुवर्ण, प्रतीक्षा साळवी (नवनिर्माण वरिष्ठ महाविद्यालय) रौप्य. जिल्हा ज्युनिअर पुरुष १०५ किलो वजनगट - प्रथमेश पावसकर (नवनिर्माण वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) याने सुवर्णपदक पटकावले. या सर्व खेळाडूंची ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान रावेर (जळगाव) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युथ १ ज्युनिअर स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचा शाळा मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच भारती पाटील, संघटनेचे सचिव व राष्ट्रीय पंच संजय झोरे, समिधा झोरे, छत्रपती पुरस्कार विजेती प्रियदर्शनी जागुष्टे यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)स्पर्धेसाठी रवानारावेर (जळगाव) येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला दिनांक ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी अनुजा सावंत आणि प्रथमेश पावसकर यांच्यासह अन्य खेळाडू रवाना झाले आहेत.