शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद गडाच्या रस्त्यावर अज्ञाताने काढले चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:19 IST

गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंद गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात अज्ञाताने चार ठिकाणी शुक्रवारी रात्री जेसीबीने चर काढले आहेत. याप्रकरणाने येथे खळबळ निर्माण झाली असून श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानसह गोवळकोट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर चर काढल्याने नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही या घटनेची गंभीरपणे दखल घेतली आहे.

ठळक मुद्देगोविंद गडाच्या रस्त्यावर अज्ञाताने काढले चरश्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानसह ग्रामस्थ आक्रमक, नगराध्यक्षांनी केली पाहणी

चिपळूण : गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंद गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात अज्ञाताने चार ठिकाणी शुक्रवारी रात्री जेसीबीने चर काढले आहेत. याप्रकरणाने येथे खळबळ निर्माण झाली असून श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानसह गोवळकोट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर चर काढल्याने नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही या घटनेची गंभीरपणे दखल घेतली आहे.येथील नगर परिषदेने गोविंद गडावर पाणी योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प १९९२ मध्ये उभारला असून त्याठिकाणी जाण्यासाठी गोवळकोट ताराबौद्धवाडीच्या बाजूने नगर परिषदेने रस्ता केला आहे. या रस्त्यावर अनेकदा नगर परिषदेने निधीही खर्च केला आहे. त्यानंतर आता हाच रस्ता साठवण टाकीपासून गोविंद गडापर्यंत जाण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून नव्याने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र काहींनी या रस्त्याच्या जागेवर हक्क दाखवण्यास सुरुवात केली असून त्यातूनच हा चर खोदाईचा प्रकार घडला असल्याची माहिती पुढे आली आहे.शुक्रवारी रात्री कोणाच्याही न कळत गडावरील रस्त्यावर चर काढण्यात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी लक्षात येताच श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, सचिव उदय जुवळे, ग्लोबल टुरिझम चिपळूणचे अध्यक्ष राम रेडिज, महेंद्र कासेकर, राजे प्रतिष्ठानचे विशाल राऊत, शाखा प्रमुख मारुती मेंडे, बबन कासेकर, अभय जुवळे, दत्ताराम हेलवंडे, राम शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, स्थानिक नगरसेविका सुषमा कासेकर, नगरसेवक परिमल भोसले, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार आदींनी पाहणी करून याविषयी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :FortगडRatnagiriरत्नागिरी