शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरातील अंगणवाडीसेविकांनी परत केले माेबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:35 IST

असगोली : गुहागर तालुक्यातील ७ बीटमधील १८५ अंगणवाडीसेविकांनी शासनाने दिलेले मोबाइल हॅण्डसेट एकात्मिक बालविकास योजनेच्या कार्यालयात परत केले. निकृष्ट ...

असगोली : गुहागर तालुक्यातील ७ बीटमधील १८५ अंगणवाडीसेविकांनी शासनाने दिलेले मोबाइल हॅण्डसेट एकात्मिक बालविकास योजनेच्या कार्यालयात परत केले. निकृष्ट दर्जाचे हॅण्डसेट सातत्याने बिघडतात. दुरुस्तीचा खर्च अंगणवाडीसेविकांनाच करावा लागतो. पोषण ट्रॅकर ॲप वापरण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे मोबाइल जमा करत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभा मुंबईच्या गुहागर अध्यक्षा सारिका हळदणकर यांनी सांगितले.

सारिका हळदणकर म्हणाल्या की, केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर हे मोबाइल ॲप विकसित केले. या ॲपवर अंगणवाडी क्षेत्रातील स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, लाभार्थींची नावे, वजन, उंची, हजेरी आणि पोषण आहाराचे वाटप यांची माहिती दररोज भरणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीसेविकेला दोन वर्षांपूर्वी २ जीबी रॅमचा मोबाइल हॅण्डसेट देण्यात आला होता. परंतु, दोन वर्षांनी हॅण्डसेटमध्ये सातत्याने बिघाड सुरु झाला आहे. शासन दुरुस्तीचा खर्चही देत नाही. इंटरनेटचा वेग कमी असल्याने माहिती चटकन भरली जात नाही. ॲप इंग्रजीमध्ये असल्याने अनेक सेविकांना त्रयस्थाची मदत घ्यावी लागते. ॲपमध्ये चुकीचा तपशील खोडणे किंवा दुरुस्त करण्याचा पर्याय नाही. त्यामुळे अंगणवाडीसेविका वैतागल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने महिला व बालकल्याणमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त एकात्मिक बालविकास यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. मात्र, केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय सांगत मान्यवरांनी समस्या सोडविण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे ९ ऑगस्टला कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत ॲपवर माहिती न भरता आल्यास मानधन कापू नये, असे आदेश न्यायालयाने दिले.

त्यानंतर गुहागरमधील अंगणवाडीसेविकांनी नादुरुस्त मोबाइल जमा करण्याबाबतचे पत्र प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास योजना यांना दिले. त्याप्रमाणे १८५ अंगणवाडीसेविकांनी पर्यवेक्षिका अश्विनी पाटील आणि मोबाइल विभागाचे प्रमुख नितेश मालप यांच्याकडे जमा केले.