शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

निवेदन सादर : जिल्हा परिषदेकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आश्वासन

रत्नागिरी : अंगणवाडी सेविका पदावर पाच वर्षे काम केल्यानंतर तिच्या जागी नवीन सेविका नियुक्त करून तिची मदतनीस पदावर नियुक्ती करण्यात आली. खेड तालुक्यातील चोरवणे येथील अन्यायग्रस्त अंगणवाडी सेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अर्धा दिवस पुन्हा उपोषण केले. यावेळी तिने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आरती अनंत शिंदे (रा. चोरवणे, ता, खेड) यांची चोरवणे - गावठाणवाडी येथे २००८ साली अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचे पती अपंग असल्याने बेरोजगार आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, नवीन शैक्षणिक अर्हतेनुसार अंगवाडी सेविका आठवी पास असणे गरजेचे असल्याचे कारण सांगत त्यांना मदतनीसपदी नेमणूक देण्यात आली. त्यानुसार त्यांचे वेतनही कमी झाले. मात्र, प्रत्यक्षात आरती शिंदे या अंगणवाडी सेविकेचे काम करत होत्या. दरम्यानच्या कालावधीत त्या आठवीच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाल्या. मात्र, त्यांची नियुक्ती मदतनीसपदीच राहिली. याबाबत त्यांनी अनेकदा दाद मागण्याचा प्रयत्न केला. अखेर राष्ट्रीय मानवाधिकार एवं पुनरूद्धार संघटन (नारो) च्या खेड शाखेतर्फे न्यायालयात दाद मागण्यात आली. यावर न्यायालयाने आरती शिंदे या आठवी पास ही अर्हता पूर्ण करीत असल्याने त्यांची नियुक्ती अंगणवाडी सेविकापदी करण्याचे आदेश तातडीने दिले. मात्र, न्यायालयाचा आदेश एकात्मिक बालविकास अधिकारी, खेड यांनी धुडकावून लावला. शिंदे यांची नियुक्ती अमान्य करून २८ जानेवारी रोजी नवीन अंगणवाडी सेविकेसाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. सन २००९ पासून शिंदे मदतनीस पदावर राहून अल्प पगारावर अंगणवाडी सेविकेचे काम करत होत्या. त्यामुळे याप्रकरणी शिंदे यांना २००९ सालापासून अंगणवाडी सेविकेच्या वेतनातील नुकसान भरपाई मिळावी, तसेच त्यांना पुन्हा अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती मिळावी, यासाठी आरती शिंदे, त्यांचे कुटुंबीय तसेच कॅ. अनंत निकम यांनी आज दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.हे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी स्वीकारले. या निवेदनात त्यांनी २००८पासून आतापर्यंतचे वेतन मिळावे, तसेच अंगणवाडी सेविका भरतीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, खेड यांनी काढलेली जाहिरात नोटीस रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषदेकडे कार्यवाहीकरिता हे निवेदन लगेचच पाठविले जाईल, असे निगुडकर यांनी सांगितले.या उपाषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास पुन्हा तीव्र उपोषण करण्यात येईल, असे कॅ. निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाच वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेल्या सेविकेला हटवून केली मदतनीस पदावर नियुक्ती.उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकेचे पती अपंग.आरती शिंदे यांचे कुटुंबीयही उपोषणात सहभागी.उपोषणाची दखल न घेतल्यास प्रशासनाविरूध्द पुन्हा उपोषण करण्याचा इशारा.अर्धा दिवस केले आंदोलन.अंगणवाडी सेविका पदावर पाच वर्षे काम केल्यानंतर मदतनीस पदावर नियुक्ती केल्याने अंगणवाडी सेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (सोमवार) अर्धा दिवस पुन्हा उपोषण केले.