रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी वाहतूक करणाºया मारूती वडापमधून बेकायदेशीर गांजाची वाहतूक करणाºया दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दीड किलो गांजासहित अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरात अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणारे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे बुधवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते.कोल्हापूर येथून येणारी मारूती ओमनी (एमएच-०९- बीसी- ३१३४) ही गाडी संशयितरित्या फिरताना यावेळी दिसली. काहीवेळानंतर ही कार जिल्हा परिषदेच्या गेटसमोर येऊन थांबली. त्यावेळी जहीर काझी त्याठिकाणी आला. त्यावेळी ओमनी चालक विशाल वसंत पाटील याने गाडीतून पिशवी काढून त्याच्याकडे दिली.पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यात गांजा असल्याचे आढळून आले. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरीत अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणारे रॅकेट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 15:39 IST
रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी वाहतूक करणाºया मारूती वडापमधून बेकायदेशीर गांजाची वाहतूक करणाºया दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दीड किलो गांजासहित अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरात अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणारे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ...
रत्नागिरीत अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणारे रॅकेट?
ठळक मुद्देपोलीस तपास युध्दपातळीवरदीड किलो गांजासहित अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तरॅकेट असण्याची शक्यता