शिवाजी गोरे ल्ल दापोली हापूस आंब्याच्या मार्केटमध्ये गडगडलेल्या भावामुळे कोकणातील शेतकर्याच्या डोळ्यात आसू झाले आहेत. आंबा बागायतदारांच्या आसवाला दिलासा देण्यासाठी कोकणातील प्रगतशील शेतकरी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते माधव महाजन यांनी आंब्यापासून आसव (वाईन) बनवले आहे. फळांचा राजा हापूस दरवर्षी संकटात सापडत असून, आंब्यावरील संकटामुळे हापूस कवडीमोल दराने विकण्याची वेळ आंबा बागायतदारांवर येऊ लागली. पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षापासून वाईन बनवण्यात यश आल्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. त्याच धर्तीवर आंब्यापाून वाईन बनवण्याची गरज असून, त्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे. दापोली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महाजन यांनी शेतकर्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आसव हा उत्तम पर्याय शोधून काढला आहे. आंब्यापासून बनवलेली आसव (वाईन) झिरो अल्कोहोल असलेली आहे. करवंद, जांभूळ, काजूपासून वाईन बनवण्याचा प्रयत्न महाजन यांनी यापूर्वीच केला होता. यामध्ये ते यशस्वीही झाले होते. त्यानंतर त्यांनी आंब्यावरील आसवचा यशस्वी प्रयोग केला आहे. येथील कवडीमोल किमतीने विकल्या जाणार्या आंब्यापासून आसव बनवून शेतकर्याना त्यातून चांगले पैसे मिळावेत, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. हापूस आंब्यापासून उत्कृष्ट दर्जाची आसव त्यांनी बनवली असून, शास्त्रीयदृष्ट्या ती वाईन शरीराला चांगली आहे. यापासून शरीराला कोणताही अपाय होत नाही. वाईन हा शब्दच मुळात बदनाम झाला आहे. वाईन म्हटले की, त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यामुळे वाईन पिणार्याला चांगली वागणूक मिळत नाही. वाईन म्हटले की, दारु हाच शब्दप्रयोग केला जातो. मात्र, तो शब्दप्रयोग चुकीचा आहे.
आंबा बागायतदारांना ‘आसव’चा पर्याय : माधव महाजन
By admin | Updated: May 14, 2014 00:24 IST