शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबत पाणीटंचाईचे संकटही तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

जिल्ह्यात ३३ गावांतील ५१ वाड्यांमधील टँकर्सग्रस्तांना ११ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण ...

जिल्ह्यात ३३ गावांतील ५१ वाड्यांमधील टँकर्सग्रस्तांना ११ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण आहेत. टंचाईग्रस्त गावांमुळे जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यातच कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने पाण्यासाठी हाल होत आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा मोठा समावेश आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांना पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत. कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले, विंधन विहिरी आटल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावली आहे. या टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना शासनाची दमछाक होत आहे. लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.

जनावरांची पाण्यासाठी तडफड

टंचाईग्रस्त गावांना शासकीय ३ आणि खासगी ८, अशा केवळ ११ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. जिल्ह्यात प्रशासनाकडून केवळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. त्यामुळे इतर वापरासाठी पाणी आणण्यास डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागत आहे.

टंचाईची कामे सुरू होण्यापूर्वी पावसाळा येणार

जिल्ह्यात पाणीटंचाई भासत असली तरी टंचाई कृती आराखड्यातील कामे सुरू झालेली नाहीत. अजूनही पाणीपुरवठ्याची कामे निविदास्तरावर आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यावर कोरोनाचे सावट असतानाच पाणीटंचाईची भीषणताही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच टंचाईची कामे सुरू होईपर्यंत पावसाळा येऊन पाणीटंचाई संपणार, अशी परिस्थिती दिसून येत आहे.

................................

टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर...

तालुका गावे वाड्या टँकर

मंडणगड ०१ ०१ ०१

रत्नागिरी ०२ ०६ ०१

खेड १० १९ ०४

चिपळूण ०७ ०९ ०१

संगमेश्वर ०७ १० ०२

लांजा ०५ ०५ ०१

राजापूर ०१ ०१ ०१

एकूण-- ३३ ५१ ११

.................................

वाड्या आणि लोकसंख्या

तालुका वाड्या लोकसंख्या

मंडणगड ०१ ६१०

रत्नागिरी ०६ १४१६

खेड १९ १३२०

चिपळूण ०९ ८२७

संगमेश्वर १० ९५९

लांजा ०५ ७१३

राजापूर ०१ २८

एकूण- ५१ ५४२३

रहीम दलाल