शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार

By शोभना कांबळे | Updated: March 1, 2024 11:43 IST

शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले

शोभना कांबळेरत्नागिरी : स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी रत्नागिरीत १ मार्च १९२७ रोजी आलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्कालीन रत्नागिरी जिल्हा लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा चांदीचा करंडक येथील थरवळ कुटुंबीयांनी अजूनही जतन केला आहे. या करंडकाला शुक्रवार, १ मार्च २०२४ रोजी ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा वसा पुढच्या पिढ्याही जतन करणार आहेत.रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागीरथी निवासात महात्मा गांधी २९ फेब्रुवारी १९२७ रोजी उतरले होते. गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांंची अलोट गर्दी होती. दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्या वतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तूंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. गांधीजींनी प्रघाताप्रमाणे या चंदनी हार, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव केला. रत्नागिरीतील सुस्वभावी प्रसिद्ध व्यापारी गणपतशेठ थरवळ यांनी हा सन्मान त्याकाळी ५०० रुपयाला विकत घेतला. शुक्रवारी, १ मार्च रोजी या घटनेला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत.गांधीजींच्या या भेटीपासून गणपतशेठआणि मुकुंद व विश्वनाथ ही त्यांची दोन मुले देशभक्तीने भारावलेली होती. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. मुकुंदराव यांनी तर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. कारावासही भोगला होता. गणपतशेठ यांनी गांधीजींच्या या चांदीच्या करंडकाचे जीवापाड जतन केले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आणि रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ हा करंडकाचा ठेवा जतन करीत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक योगदान तसेच महात्मा गांधी यांच्या रत्नागिरीतील पदस्पर्शाची आठवण म्हणून हा ठेवा सुभाष थरवळ जतन करीत आहेत. यानंतरही मुलगा मनीष आणि नातू सिद्धार्थ आणि त्या पुढच्याही पिढ्यान् पिढ्या हा ठेवा तेवढ्याच अभिमानाने जतन करतील, असा प्रगाढ विश्वास सुभाष थरवळ यांना आहे.करंडक अजूनही तसाच चंदनी हार काळाच्या ओघात खराब झाला. मात्र, चांदीचा करंडक अजूनही तसाच आहे. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण. १ मार्च १९२७,’ असा मजकूर लिहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला गांधीजींच्या चरख्याचे चित्र रेखाटलेले आहे.

थरवळ घराणे गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेले होते. त्यामुळे त्यांना सन्मानात मिळालेल्या करंडकाचेही आतापर्यंत अभिमानाने जतन करण्यात आले आहे. यापुढच्या पिढ्याही हा बहुमोल ठेवा तेवढ्याच अभिमानाने नक्कीच जतन करतील. -सुभाष थरवळ, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMahatma Gandhiमहात्मा गांधी