शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आरोप-प्रत्यारोपांचे फटाके?

By admin | Updated: November 18, 2016 23:12 IST

नगर परिषद निवडणूक : फडणवीस, दानवे, तटकरेंसह बड्या नेत्यांच्या प्रचार सभांकडे जिल्ह्याचे लक्ष

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला होत असून, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव हे अंतिम टप्प्यातील प्रचाराची माळ गुंफण्यासाठी लवकरच जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या प्रचारसभांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषदा व दापोली नगर पंचायतीची निवडणूक होत असली तरी यातील रत्नागिरी व चिपळूण या ब वर्गातील दोन नगर परिषदा ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार डावपेच खेळले जात आहेत. यातील रत्नागिरी नगर परिषद ही गेल्या कार्यकाळात सेना-भाजप युतीच्या ताब्यात होती. आता सेना व भाजप युती नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. ही नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने रत्नागिरी, चिपळूणमध्येही भाजपची सत्ता आल्यास विकासाचे स्वप्न नागरिकांना दाखविले जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठी फडणवीस सरकारने नगरोत्थान योजनेतून ६२ कोटींची सुधारित नळपाणी योजना मंजूर केली आहे. भाजपसाठी हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस २० नोव्हेंबरला रत्नागिरीत, तर २१ रोजी दानवे हे चिपळुणात सभा घेणार आहेत. रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रात गेल्या पाच वर्षात युतीने काय विकास केला, असा सवाल करीत राष्ट्रवादीचे नेते सेना, भाजपवर बरसण्याची शक्यता आहे. चिपळूण नगर परिषदेवर गेली पाच वर्षे शहर विकास आघाडीची सत्ता होती. चिपळुणात माजी आमदार रमेश कदम यांचा असलेला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते चिपळुणात प्रचार सभा घेणार आहेत. रत्नागिरी हे जिल्हा राजधानीचे ठिकाण, तर चिपळूण हे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींचे मुख्य ठिकाण असल्याने या दोन्ही ब वर्ग नगर परिषदा ताब्यात असणे राजकीय पक्षांना महत्त्वाचे वाटते आहे. खेड नगर परिषदेत गेल्या पाच वर्षात मनसेची एकहाती सत्ता होती. सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा हा राजकीय गड मानला जातो. मात्र, गेल्यावेळी हातून निसटलेला हा गड यावेळी मनसेकडून काबीज करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघणार आहे. आरोप - प्रत्यारोपांचे फटाके फुटणार आहेत. चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव उतरणार प्रचार रिंगणात. विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघणार. नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० नोव्हेंबरला रत्नागिरीत येत आहेत. त्यांची जाहीर प्रचार सभा शहरातील प्रमोद महाजन संकुल येथे होणार आहे. त्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडांगणावर भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रचार सभेला शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच संपूर्ण जिल्हाभरातील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.