शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शोलेतील जय अवतरला लांजात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:58 IST

दारू पिऊन तर्रर्र असलेला तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर सोमवारी सायंकाळी चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता.

लांजा : मला दहीहंडीची प्रॅक्टिस करायची आहे असे सांगत एक मद्यपी माणूस मोबाईल टॉवरवर चढला. त्याचे ते लडखडते वर्तन पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. शोलेतल्या जयची आठवण करून देणारा हा प्रकार सोमवारी सायंकाळी लांजा बसस्थानकाजवळ घडला. दारू पिऊन तर्रर्र असलेला तरुण लांजा बसस्थानकांच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर सोमवारी सायंकाळी चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता.

हा टॉवरला जवळपास तीनशे फूट उंच आहे. सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास विजय पांडुरंग नेमण ( ४५ ) हा याने टॉवरवर चढायला सुरुवात केली. बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेले रिक्षाचालक तसेच लोकांनी यांनी त्याला पाहिले टॉवरवर न चढण्याचा सल्ला दिला. मात्र तो कुणाचेही न ऐकता विजय लोखंडी शिडीवर चढ होता. खाली मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती प्रत्येकजण त्याला खाली उतर असे विनंती करत होते. मात्र तो ऐकतच नव्हता व वरून तो दहीहंडीचे दिवस आले आहेत. मी सराव करतो आहे, असे बोलत होता.

तो जवळपास दिडशे फुट वरती चढला तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. तातडीने सहाय्यक पोलीस फौजदारी दिलीप पवार , सुनील चवेकर , उदय धुमास्कर , हेडकाँन्टेबल प्रमिला गुरव , शांताराम पंदेरे यांनी धाव घेतली आणि त्याला उतरण्यास सांगितले . पोलिसांना पाहिल्यानंतर तो खाली उतरला ताबडतोब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे . शहरामध्ये मिळेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह चालवतो व उरलेल्या पैशांची दारु पितो असा त्याचा नित्यक्रम असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.