शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाटणेच्या तोंडाला मद्याचा वास

By admin | Updated: July 8, 2017 18:16 IST

वैद्यकीय अहवाल : पुढील तपासणीसाठी रक्ताचे नमुने कोल्हापूरला

आॅनलाईन लोकमत रत्नागिरी, दि. ८ : भरधाव वेगाने कार चालवून अनेकांना धडक देणाऱ्या ऋषिकेश पाटणे याच्या तोंडाला मद्याचा वास येत असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे़ शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण समजण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी पत्रकारांना दिली़

ऋषिकेश पाटणे हा बुधवारी वॅगनआर कार घेऊन जात होता़ त्यावेळी त्याचा गाडीचा ताबा सुटला़ त्याने दुचाकी व चारचाकी गाड्यांना धडक दिली. बस स्थानकासमोर त्याची कार दुभाजकावर आपटली. या एकूणच अपघातात चारजण धडक दिली होती़ त्यातील प्रकाश अनंत शिंदे व ऋषिकेश नलावडे गंभीर जखमी झाले, तर तस्लीम तांबू व तिचा मुलगा महंमद हे किरकोळ जखमी झाले होते़ या दुर्घटनेत ऋषिकेशही जखमी झाला़ तसे त्याला जमावाने मारहाणही केली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला़ आहे.

पोलिसांनी ऋषिकेश पाटणे याची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या अहवालात ऋषिकेश पाटणे याच्या श्वासातून मद्याचा वास येत असल्याचे, तसेच अशक्तपणा व बोलण्यात अस्पष्टपणा असल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे अपघाताच्या वेळी ऋषिकेश पाटणे याच्या शरीरात मद्याचे प्रमाण किती होते, हे समजण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती विनीत चौधरी यांनी पत्रकारांना दिली़