शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेचा होणारा आखाडा

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

रत्नागिरी नगरपालिका : नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांमध्ये राजकीय सामना...

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक होणार असली तरी ही निवडणूक शिवसेना व भाजप मित्रपक्ष यांच्यातच होणार असल्याचे उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले असून, भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर विरुद्ध सेनेचे उपनगराध्यक्ष विनय मलुष्टे यांच्या नेतृत्त्वाखाली पालिकेतील सेना व भाजपमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. त्यातच युती म्हणून सत्तेवर येताना सेनेतर्फे रत्नागिरीकरांना विकासाचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षात नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सेनेची बाजू सांभाळली. त्यानंतर भाजपकडेच रत्नागिरी पालिकेची सत्ता आहे. सेनेलो दिलेला नगराध्यक्षपदाचा शब्द भाजपने पाळला नाही. अल्पमतात असतानाही तांत्रिक कारणामुळे पालिकेत भाजप नगराध्यक्षच आहेत. सेनेचे सभागृहातील संख्याबळ १५ आहे, तर भाजपकडे ८ नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या पाचपैकी चार नगरसेवकांनी मतदान केल्याने भाजप व राष्ट्रवादीची जवळीक उघड झाली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक एकट्याच्या बळावर जिंकण्याएवढी राजकीय ताकद शहरात भाजपकडे व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडेही नाही. त्यातच सेनेशी पंगा घेतल्याने भाजपला राष्ट्रवादीशी जवळीक करण्याशिवाय पर्याय नाही. अशी आघाडी करून नोव्हेंबर २०१६ ची पालिका निवडणूक जिंकून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे भाजप-राष्ट्रवादीचे स्वप्न आहे. मात्र, युती करून भाजपने सेनेची प्रत्येकवेळी कशी फसवणूक केली, यावर भर देत शिवसेना रत्नागिरीकरांपुढे जाण्यास सज्ज झाली आहे. युती म्हणून दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होऊ देण्यात भाजपने अडथळे निर्माण केले व विकासकामांना न्याय देता न आल्याने आता शिवसेनेलाच पूर्ण बहुमत द्या, सत्ता द्या, असे आवाहन नागरिकांना करीत भाजपला धोबीपछाड मारण्याच्या तयारीला शिवसेना लागली आहे. येत्या आठ महिन्यांच्या काळात ज्या ज्या सभा होतील त्या न झालेल्या विकासकामांवरून गाजविण्याचा जोरदार प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांकडून केला जाणार आहे. त्यासाठीच पालिका कामकाजाचा अनुभव असलेल्या नगरसेवक विनय मलुष्टे यांना शिवसेनेने उपनगराध्यक्षपदावर बसविले आहे. मलुष्टे हे विकास कामांबाबत भांडणारे आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे येत्या काही काळात शहरातील मूलभूत सोईसुविधांमधील त्रुटी, न झालेली विकासकामे याबाबत पालिका सभांमधून रण माजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुकाप्रमुख असलेले बंड्या साळवीही सभागृहात आहेत. सेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राहुल पंडित यासारखे अभ्यासू नगरसेवक सेनेच्या ताफ्यात आहेत. (प्रतिनिधी)खंबीर नेतृत्त्व : मलुष्टे सेनेचे आक्रमक नेते...उपनगराध्यक्ष विनय मलुष्टे हेही आक्रमक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नगराध्यक्षांचा ते व्यवस्थित सामना करू शकतात, असा सेनेचा होरा आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असताना मलुष्टे हे महेंद्र मयेकर यांचा कसा सामना करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.राजकीय खेळीमध्ये हुशार मानले जाणारे भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर शिवसेनेच्या आव्हानाला कसे सामोरे जाणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेला भविष्यात ते कसे हाताळतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.