शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मदतनिसांच्या मानधनाचा खोळंबा

By admin | Updated: August 31, 2014 23:41 IST

अपेक्षांवर पाणी : गणेशोत्सवात चणचण असल्याने नाराजी

गुहागर : गुहागर तालुक्यातील एकात्मिक बालविकास खात्यांतर्गत २२९ अंगणवाड्यांचे काम पाहणाऱ्या अंगणवाडी व मदतनिसांचे मानधन गेल्या दोन महिन्यांपासून न मिळाल्याने नाराजी आहे. गणेशोत्सवापूर्वी हे मानधन मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र, ते न मिळाल्याने या महिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे.गणेशोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. तत्पूर्वी मानधन मिळणे गरजेचे होते. अंगणवाडी सेविकांसाठी ५ हजार रुपये, तर मदतनिसांसाठी ३ हजार रुपये मानधन दिले जाते. दर दोन ते तीन महिने एवढ्या उशिरा मानधन काढले जाते. गणेशोत्सवापूर्वी राहिलेले मानधन काढले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, अद्याप मानधन मिळालेले नाही. याबाबत एकात्मिक बालविकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या मानधनाची अर्धी रक्कम खात्याकडे नुकतीच वर्ग करण्यात आली असून, लवकरच अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या सेविकांचे मानधन आधीच कमी असताना जुलै महिन्याचे पूर्ण मानधन न देता काही रक्कमच दिली जाणार असल्याने शासन या सेविकांची चेष्टा करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.अंगणवाड्यातून दिला जाणारा पोषण आहार व इतर कार्यालयीन कामकाजासाठी संगणक आवश्यक असताना कार्यालयातील दोन संगणक दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. उपलब्ध संगणकही काम करण्यास योग्य नसल्याने कामाची गैरसोय होऊन संबंधित सर्वांचेच नुकसान होत असल्याने या कार्यालयाला नवीन संगणक संच द्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)