शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भात नुकसानाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

गुहागरातील प्रकार : परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ओढवले संकट

असगोली : गुहागर तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्याकडे कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानाची नोंद केलेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आम्ही कार्यालयात बसून वाट पाहात आहोत, असे येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने कृषी विभागाच्या या अजब कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभर शेतामध्ये राबायचे आणि जेव्हा शेतीचे उत्पन्न येते त्यावेळी ऐन पावसाने हातचे पीक हिरावून न्यायचे, अशी स्थिती सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. तयार झालेली भातशेती पावसामुळे जमिनीवर पडली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले शेत भिजल्याने नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. काही भातशेतीची कापणी झाली असली तरी महान जातीच्या शेतीची कापणी सुरू आहे. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचा कोणीतरी येईल, अशी वाट पाहून अखेर नुकसान होऊ नये, म्हणून जे मिळेल ते आपले असे म्हणत कापणीला लागलेल्या शेतकऱ्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयात बसून नुकसानग्रस्त शेतकरी आपले नुकसान झाले आहे, अशी विनंती करीत येईल आणि त्यानंतर त्याच्या शेताचा सर्वे करुन शासनाकडे अहवाल पाठवू, असे नियोजन करून अधिकारी व कृषी सहाय्यक कार्यालयात बसून शेतकऱ्यांची वाट पाहत आहेत. मात्र, या अजब कारभारामुळे शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग की कृषी विभागासाठी शेतकरी? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी १२०० हेक्टर महान भातशेती कापणी शिल्लक आहे. एकूण कापणी शिल्लक असलेल्या भातशेतीपैकी ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाले तरच शासन शेतकऱ्यांना भातशेती नुकसानभरपाई देते. मात्र, पाऊस पडून दोन दिवस झाले तरी कोणत्याही कृषी सहाय्यकाला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये डोकावून पाहण्यास वेळ नाही. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्या भागातील शेतीची तेथील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाने पाहणी करुन कार्यालयाकडे अहवाल देणे बंधनकारक आहे. मात्र, असे कोणतेच चित्र तालुक्यात पाहावयास मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची माहिती मागविली असताना तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभाग यापैकी कोणालाही नुकसानाची माहिती देता आली नाही. (वार्ताहर)