शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

'मनसे नाणारच्या विरोधात, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 13:36 IST

पालकमंत्री, खासदार, आमदार  ही सर्व सत्तेमधील नेतेमंडळी  केवळ घोषणाबाजी करीत आहेत. प्रकल्पाबाबतची केवळ घोषणाबाजी, राजकारण करण्यापेक्षा प्रथम प्रकल्पाचे काम सुरू करा

देवगड : पालकमंत्री, खासदार, आमदार  ही सर्व सत्तेमधील नेतेमंडळी  केवळ घोषणाबाजी करीत आहेत. प्रकल्पाबाबतची केवळ घोषणाबाजी, राजकारण करण्यापेक्षा प्रथम प्रकल्पाचे काम सुरू करा, तरच जनता व मनसे तुमचा जाहीर सत्कार करेल, असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

हॉटेल डायमंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर यांनी सत्ताधाºयांबरोबरच विरोधी आमदारांवरही टीका केली. ते म्हणाले, एकीकडे भाजपाचे माजी आमदार औष्णिक प्रकल्पाला विरोध करीत होते व आता नाणारसारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाची बाजू घेऊन समर्थन करताना दिसत आहेत. परंतु मनसे पक्ष नाणार प्रकल्पाच्या विरोधात असून प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या प्रकल्पाची झळ मच्छिमार व आंबा बागायतदारांना पोहोचणार आहे याचे कोणालाही सोयरसुतक नाही. चार वर्षांपूर्वी पवनऊर्जा प्रकल्प, आनंदवाडी प्रकल्प याबाबत माजी आमदारांनी घोषणाबाजी केली होती. 

आनंदवाडी प्रकल्पाचे काम आधी सुरू करा व नंतरच बोला. प्रकल्पावरून माजी आमदार, खासदार, विद्यमान आमदार यांच्यामध्ये राजकारण सुरू झाले आहे. देवगडमधील जनतेला राजकारणाचे कोणतेही देणे-घेणे नाही. घोषणाबाजी करण्यापेक्षा प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करा, असे आव्हानही उपरकर यांनी दिले.देवगड तालुक्याचे सुपुत्र हे आरोग्यमंत्री असूनही तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था गंभीर आहे. देवगड ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित करण्यासाठी पाच वर्षे लागली. या रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त असून सोयीसुविधांची वानवा आहे. निवडणुका जवळ आल्या की घोषणा केल्या जातात. अशाप्रकारच्या घोषणा आता जनतेला ऐकायला मिळतील. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेनेच ठरवावे.     - परशुराम उपरकर, मनसे प्रदेश सरचिटणीस