शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

साडेतीन महिन्यांनी विद्यार्थ्यांना आहाराचा घास

By admin | Updated: September 23, 2014 00:14 IST

कडवईतील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना अटकपूर्व जामीन

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर मुख्याध्यापक अशोक साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला व ते मुख्याध्यापकपदी रूजूही झाले. या सर्व घडामोडीत विद्यार्थ्यांचा पोषण आहार मात्र गेले साडेतीन महिने बंदच होता. पालकांच्या रेट्यानंतर दोनच दिवसाप्ांूर्वी कडवई, वाणीवाडी येथील एका बचत गटामार्फत हा पोषण आहार चालू करण्यात आला आहे.शैक्षणिक वर्ष संपले असताना १५ एप्रिल २०१४ रोजी भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहाराच्या खोलीत १३८ पोती तांदूळ, २४० लीटर तेल, डाळी व इतर साहित्य असा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणल्यानंतर कडवईमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर हा साठा सील करण्यात आला होता. मात्र, ६ जून २०१४ रोजी पाहणी केली असता चौकशीअंती हा तांदूळ व इतर साहित्य आरवली येथील पाटणकर नामक रेशन दुकानरादाला विकला गेल्याचे उघड झाले.या सर्व प्रकाराची कल्पना मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार कालम-पाटील यांना दिली असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. यानंतर शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक साळुंखे यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर साळुंखे यांनी गैरहजर राहून अटकपूर्व जामीन मिळवला. जुलै महिन्यात पुन्हा त्यांच्या हाती मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात आला.या सर्व घडामोडीत भाईशा घोसाळकर हायस्कूलचे विद्यार्थी मात्र पोषण आहारापासून वंचित होते. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या अखत्यारित पोषण आहार चालवण्यास येथील बचत गटांनी असहमती दर्शवली होती. या कालावधीत ७ जुलै दरम्यान शासनाकडून पोषण आहाराचे साहित्य मागणीप्रमाणे पाठवण्यात आले. मात्र, पोषण आहाराची खोली आजतागायत सील असल्याने हे साहित्य दुसऱ्या एका खोलीत उतरवण्यात आले. यातील बरेचसे साहित्य खराब झाले असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने काही दिवसांपूर्वी निदर्शनास आणून दिले होते. याबाबत शिक्षण विभागाशीही संपर्क साधण्यात आला होता. मात्र, या नुकसानीला मुख्याध्यापकच जबाबदार असल्याचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले होते.पोषण आहार चालू करण्यासाठी ग्रामस्थ आग्रही होते. नुकत्याच झालेल्या एका पालक सभेत पोषण आहार चालू करण्याबाबत एकमत झाले. यावेळी कडवई पाणीवाडी येथील जय हनुमान महिला बचत गटावर हा पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी देण्यात आली. १८ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असल्याने साडेतीन महिन्यांपासून शिक्षण विभाग, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या कातडीबचाव धोरणाने उपाशी राहिलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.कडवई येथील हायस्कूलमधील पोषण आहारामधील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन या प्रकाराची चौकशी करण्यात आली या साऱ्या प्रकारानंतर संबंधित मुख्याध्यापकाने अटकपूर्व जामिन मिळविला. या साऱ्या प्रकारात पोषण आहार विद्यार्थ्यांना बंद होता तो आता सुरू झाला. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)