शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दुसऱ्या यादीनंतर आऊट गोर्इंग?

By admin | Updated: January 30, 2017 23:42 IST

जिल्हा परिषद निवडणूक : डावललेले इच्छुक अन्य पक्षांच्या आश्रयाला?

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेअंतर्गत असंतोष वाढला आहे. या यादीत ज्यांना डावलण्यात आले, त्यांनी अन्य पक्षांमध्ये जाण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याची जोरदार चर्चा आहे. सेनेच्या दुसऱ्या यादीनंतर असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता असून, सेनेतून ‘आऊट गोर्इंग’ सुरू होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी, तर रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली या ९ पंचायत समित्यांच्या ११० जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. शिवसेनेत उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने वरिष्ठ नेत्यांसाठी ती मोठीच डोकेदुखी ठरली आहे. काही गट व गणांमध्ये अनेक मातब्बर इच्छुक उमेदवार पुढे आल्याने उमेदवारी कोणाला द्यावी व कोणाला बाजूला ठेवावे, हे ठरविणे पक्ष नेत्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. शिवसेना जिल्ह्यातील नंबर वन पक्ष असल्याने पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांचे समाधान करणे अशक्य असल्याने अनेकजण नाराज होऊन दुसऱ्या पक्षाचा मार्ग धरतील, ही भीतीही निर्माण झाली. सर्वात प्रथम उमेदवार यादी जाहीर करून अन्य पक्षांना धक्का देण्याचा सेना नेत्यांचा प्रयत्न त्यामुळे फसला. यादी लवकर जाहीर केली तर बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची भीती होती. त्यामुळेच यादी जाहीर करण्याचा मुहूर्त सातत्याने पुढे ढकलण्यात आला. २८ नोव्हेंबरला गट व गणांची मिळून १०६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यातही खाडाखोड असल्याने सेनेत वादंग माजला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अनेकजण पक्षाला जय महाराष्ट्र करून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, दापोली, खेड व चिपळूण या तालुक्यांमध्ये शिवसेनेत मुळातच अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. दापोलीमध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना एकटे पाडण्यात आल्याने ते प्रचंड नाराज आहेत. रत्नागिरी तालुका शिवसेनेत नवा-जुना वाद उफाळून आला आहे. जुन्या शिवसैनिकांना डावलून नव्या गटातील कार्यकर्त्यांना अधिक जागा देण्यात आल्याने जुने शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. त्यातच इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता वाढली आहे. अनेकजण भाजपच्या संपर्कात असून, भाजपलाही निवडून येणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसात सेनेतून होणारे आऊटगोर्इंग हे भाजपसाठी ‘इनकमिंग’ ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)