शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर रत्नागिरीला नियोजन अधिकारी

By admin | Updated: July 16, 2016 23:29 IST

विकासकामांचा प्रश्न दूर : परभणीचे जुंजारे यांच्या नियुक्तीचे जिल्हा प्रशासनाकडे आदेश

रत्नागिरी : जिल्ह््याचे नियोजन सांभाळणाऱ्या नियोजन समितीला अखेर दीड वर्षानंतर जिल्हा नियोजन अधिकारी मिळाला आहे. परभणीचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी सु. ना. जुंजारे यांची रत्नागिरीचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर यांची जानेवारी २०१५ मध्ये पुणे विभागाच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. तत्पूर्वी डिसेंबर २०१४ मध्ये सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विकास सोमण यांची मुंबईला बदली झाल्याने हे पदही रिक्त झाले होते. त्यातच जिल्हा नियोजनचा कारभार सांभाळणाऱ्या विद्या मोरबाळे याही जुलै २०१५अखेर सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे पुन्हा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे पद तसेच मोरबाळे यांचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पदही रिक्त झाले. हे पद रिक्त होऊन वर्षाचा कालावधी उलटला असून, याबाबत पालकमंत्र्यांच्याकडेही सातत्याने विचारणा करण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्ताच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला होता. १ जुलैला नियोजन समितीच्या आढावा बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे अखेर रत्नागिरीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून सु. ना. जुंजारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गेल्या महिन्यात सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून राजन घोरपडे यांनी पदभार स्वीकारला आहे. अजूनही सहाय्यक नियोजन अधिकाऱ्याचे एक पद व सांख्यिकी अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)