शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकाचा अर्ज बाद

By admin | Updated: July 29, 2016 23:28 IST

गुहागर नगरपंचायत : समन्वयाच्या अभावामुळे बसला फटका

गुहागर : गुहागर नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कृष्णा रहाटे यांचा आलेला एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे यांनी बाद ठरवला. बहुमतात सत्ता असूनही केवळ समन्वय नसल्याने ही नामुश्कीची वेळ आल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे ११, भाजप ४ व दोन्ही पक्षांचे प्रत्येकी एक नगरसेवक असे १७ संख्याबळ आहे. राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता असल्याने सर्वांना संधी मिळावी, यासाठी प्रथम सिध्दिविनायक जाधव व त्यानंतर मयुरेश कचरेकर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली, तर भाजपकडून मित्र पक्षाचा एकही सदस्य नसल्याने शिवसेनेच्या विनायक बारटक्के यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीचे मयुरेश कचरेकर यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्यानंतर रहाटे, श्यामकांत खातूंबरोबर नगरसेवक निवडणुकीमध्ये काही मतांनी पराभव झालेल्या मानसी शेटे याचेही नाव चर्चेत होते. यामधून पक्षाच्यावतीने कृष्णा रहाटे यांना संधी देण्यात आली होती. कृष्णा रहाटे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक अधिकारी रवींद्र हजारे यांनी केलेल्या छाननीमध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले की, स्वीकृत नगरसेवक पात्रतेसाठी वकील, आर्किटेक्ट, डॉक्टर आदी काही प्रकारचा अनुभव असावा लागतो. तसे पद नसल्यास एखाद्या धर्मादाय मान्यताप्राप्त विश्वस्त संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा अनुभव असावा लागतो. कृष्णा रहाटे यांनी २००२ मधील धर्मादाय संस्थेचा केलेला अर्ज व नोंदणीपत्र सादर केले होते. हा अर्ज व नोंदणीपत्र आवश्यक निकषामध्ये न बसल्याने कृष्णा रहाटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी अभिनंदनासाठी आणलेले पुष्पगुच्छ परत नेण्याची वेळ आली. नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून लवकरच ही निवड केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)स्वीकृत नगरसेवक कचरेकर यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या निवडीवेळी कृष्णा रहाटे यांचे नाव चर्चेत होते. कागदपत्र अपूर्ण असल्याने रहाटे यांना संधी मिळाली नव्हती. काही दिवस आधीच पक्षाकडून नाव जाहीर झाले असताना जाणीवपूर्वक समन्वयाचा अभाव ठेवून कृष्णा रहाटे यांचा राजकीय ‘गेम’ केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.