शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

उपक्रमांनी गजबजलेलं ‘मामाचं गाव’

By admin | Updated: April 20, 2016 01:27 IST

नितीन करकरे : रस्टिक हॉलिडेज्च्या नव्या संकल्पनेला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद

आंबा झाडावर पिकतो, हेदेखील ठाऊक नाही, अशा आजच्या शहरी पिढीला निसर्गाच्या जवळ नेणं, पोटाची खळगी भरण्यासाठी निसर्गापासून लांब गेलेल्या मोठ्यांना त्यांच्या लहानपणाचा आनंद देणं... थोडक्यात निसर्गापासून तुटत चाललेल्या लोकांना निसर्गाच्या जवळ आणणं, हा हेतू ठेवून रस्टिक हॉलिडेज्ने ‘मामाच्या गावाला जाऊया’ या संकल्पनेसह विविध उपक्रम हाती घेतले. संगमेश्वर तालुक्यात तुरळजवळचं हे ‘मामाचं गाव’ असंख्य पर्यटकांच्या आयुष्यात समाधानाची, तृप्ततेची झुळूक घेऊन गेलंय, याचे मला समाधान वाटते... हे उद्गार आहेत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या नितीन रवींद्रनाथ करकरे यांचे!यंत्रयुगात वावरणाऱ्या आजच्या पिढीला मैदानी खेळ माहितीच नाहीत. सिमेंटच्या जंगलात रमणाऱ्यांना निसर्गाचा मुक्तपणा अनुभवताच येत नाही. झाडाझुडपांमधून वाहणारा वारा अंगावर घेत शुद्ध हवेने ऊर भरून घेण्यातला आनंद आता शहरीकरणाच्या लाटेत विरून गेलाय. शहरीकरण तर थांबवता येणार नाही... मग निसर्गाच्या जवळ जाऊन आयुष्य वृद्धींगत करणारा हा अनुभव घ्यायचा तरी कसा... असंख्य लोकांच्या मनातल्या या प्रश्नाला कोकणचे सुपुत्र नितीन करकरे यांनी ‘रस्टिक हॉलिडे’च्या माध्यमातून उत्तर दिलंय. ‘मामाच्या गावाला जाऊया’, ही त्यांची कल्पनाच खूप काही बोलून जाते. मुंबई - गोवा महामार्गावर तुरळ या बसथांब्यापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या मुक्त उधळणीत न्हाऊन निघालेलं ‘मामाचं गाव’. लाल मातीच्या भिंती, घरात सारवण घातलेली जमीन, सारवलेलं अंगण, जुन्या काळातल्या घराची आठवण यावी अशी घरे, अंगण, ओटा, सगळं कसं गावरान पद्धतीचं... पारंपरिकता जोपासणारे, टिकविणारे... मुंबैकर पर्यटकांच्या पसंतीला उतरलेल्या या संकल्पनेविषयी नितीन करकरे यांच्याशी साधलेला संवाद...!प्रश्न : या पर्यटनाच्या संकल्पनेबाबत तुम्हाला ही नवीन योजना (संकल्पना) कशी सुचली?उत्तर : कधी एकदा वार्षिक परीक्षा होताहेत आणि सुट्टी पडून आम्ही गावाला हुुंदडायला, मज्जा करायला, पोहायला जातोय, असे मुलांना वाटत असते. जसे आम्ही आमच्या रत्नागिरी येथील आजोळी कधी राहायला जातोय, असे आम्हाला सातत्याने वाटत होते आणि आपल्या एका मित्रासोबत असताना मॉलमध्ये फिरताना २००४ साली मामाचं गाव ही अनोखी कल्पना सुचली आणि आमच्या मोठ्या प्रशस्त परंतु लाकडी मोठी भालं असलेल्या कौलारू घरात ही कल्पना साकारण्याचं मनात आलं. याचे कॅम्पेनिंग चाले आणि सुरुवातीला केवळ प्रयोग म्हणून घेतलेल्या पहिल्या कॅम्पला केवळ २० ते २५ मुले अपेक्षित असताना तब्बल १५० मुले आम्ही सहभागी करुन घेतली. कारण क्षमता तेवढीच होती.हळूहळू मुले वाढत गेली. पुढे कुटुंब आली आणि आलेल्या कुटुंबांना आपलं लहानपण अनुभवता यावं, यासाठी पोहणं असो अथवा पारंपरिक मैदानी खेळापासून म्हणजे लगोरी, विटी-दांडू, आट्यापाट्या, भोवरा आदी खेळांसोबतच पडवीतील बैठे खेळ, रानात जाऊन स्वत: आंबे काढणे असो अथवा आंबा - काजू पाडणे असो किंवा ट्रेकिंग, बैलगाडीतून पहाटे सफर या साऱ्याची मज्जा शहरवासीयांना अनुभवता यावी, असे उपक्रम सुरू केले.प्रश्न : कोेकणातच ही संकल्पना का राबवावी वाटली...?उत्तर : सध्या कोकणातील व्यक्तींचे राहणीमान बदलले आहे. त्यात शहरीकरणाचा बाज दिसतो. उलटपक्षी कोकणातील निसर्गाच्या सानिध्यातील लाल मातीच्या भिंती आणि सारवलेली जमीन याचे आकर्षण शहरवासीयांना असतेच. तसेच ज्या ठिकाणी मोबाईल रेंज नाही, अशा ठिकाणी निवांत सुट्टी घालवावी, अशी मागणीदेखील काही प्रमाणात होत होती. या साऱ्या गोष्टी आपल्या २०० वर्षांपूर्वीच्या घरात काही एकर जमीन असलेल्या परिसरात हे देता येऊ शकेल, हे लक्षात घेऊन इथे हा व्यवसाय सुरू केला.प्रश्न : लोकांचा प्रतिसाद कसा आहे?उत्तर : आलेल्या लोकांमधून अगर त्यांच्या मित्र परिवारातून नातेवाईकांतून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. उलट अशा प्रकारे काही आठवडे मज्जा करण्यासाठी गावरान आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या चांगलीच आहे. या ठिकाणी पारंपरिकता जपली जाते, हे महत्त्वाचे! संस्कृती जतन करणाऱ्या काही जुन्या गोष्टीदेखील प्रदर्शनीय ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रीयन चुलीवरचेच जेवण देण्यात येते.प्रश्न : एकाचवेळी अनेक फॅमिली आल्या तर रहाण्याची सोय कशी करता?उत्तर : ज्यावेळी आम्ही पर्यटनाची ही योजना आखली त्यावेळी मोठे घर असले तरी स्वतंत्र कुटुंब आल्यास प्रायव्हसी नव्हती. म्हणूनच मागणीप्रमाणे दोन-तीन कॉटेजीस पर्यटकांना उपलब्ध केल्या. यावेळी अनेकांनी ‘अरे, हा वेडेपणा करु नको. इथे कोण येणार’ अशी थट्टामस्करी केली. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच प्रतिसाद वाढला आणि आता त्या कॉटेजीसची संख्या आपण लवकरच १० पर्यंत नेणार आहोत. मामाच्या गावात आलेला प्रत्येकजण मला ‘मामा’ म्हणूनच हाक मारतो, इतके ते लोकांना आपुलकीचे वाटू लागले आहे.प्रश्न : साऱ्याचं व्यवस्थापन कसे करता?उत्तर : गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे, असे आपल्याला नेहमी वाटते. याकरिता मी कोणतेही काम गावातल्या माणसांनाच देत आलो आहे. कधी मंडपाचे साहित्य, जिन्नस अथवा मनुष्यबळ याची उपलब्धता गावातच करून घेतो.प्रश्न : इथे आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबवले आहेत?उत्तर : लहान मुलांचे कॅम्प, श्रावणसरी, चला जाऊ माहेरा, मामाच्या गावाला जाऊया, निसर्ग दिवाळी, रस्टिक कॉटेजीस हे उपक्रम आम्ही चालविले आहेत. शुभंकर बिवलकर यांच्या नातेवाईकांचे लग्न वेगळ्या पद्धतीने करायचे होते. जर्मनीतील त्यांच्या बहिणीला गावातच लग्न करायचे होते. चार-पाच दिवस २५० - ३०० लोकांची व्यवस्थादेखील पारंपरिक पद्धतीने करून याठिकाणी लग्न लावून दिले होते. यावेळी जर्मनसह त्यांच्या नातेवाईकांना लाठीकाठ्या आणि दांडपट्टा हे धाडसी खेळ प्रकार खूपच आवडले. वेगवेगळे प्रयोग आणि पारंपरिक खेड्यांच्या ‘फील’ देत पर्यटकांच्या आनंदात भर घालणे, हाच माझा मुख्य उद्देश आहे.- सचिन मोहितेशहरीकरणात गुरफटलेल्यांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा उद्देश.लहान मुलांसाठीचे सुटीचे शिबिर, पावसाळ्यातल्या श्रावणसरी, चल जाऊ माहेरा, मामाच्या गावाला जाऊया, निसर्ग दिवाळी हे उपक्रम लोकप्रिय.