शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांवर होणार कारवाई

By admin | Updated: February 18, 2016 21:30 IST

शिक्षण विभागाकडून दखल: चिपळूण, राजापूर तालुक्यात आढळली होती शाळाबाह्य मुले

रत्नागिरी : जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार हे दौऱ्यावर असताना शाळाबाह्य मुले आढळून आल्याने शिक्षण विभागाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ही मुले राजापूर व चिपळूण तालुक्यांत आढळली असून, त्याबाबत शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे व एकही मूल शाळाबाह्य असता कामा नये. त्यामुळे गरिबातला गरीब तसेच कामगारांची मुलेही शिक्षण प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.मागील महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार दौऱ्यावर असताना निवळी तिठा येथे रस्ता कामगारांची शाळाबाह्य मुले आढळून आली होती. या प्रकरणी निवळी तिठा शाळेच्या मुख्याध्यापिकेवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण जोरदार गाजले होते. त्या मुख्याध्यापिकेचे निलंबन मागे घेतल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. दरम्यान, बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी चिपळूण तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. रिक्टोली गावाची पाण्याबाबत पाहणी केल्यानंतर त्या परतत असताना त्यांना सावर्डे परिसरामध्ये शाळाबाह्य मुले आढळून आली. त्यावेळी त्यांनी त्या मुलांची विचारपूसही केल्याचे समजते. बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. हे राजापूर दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनाही शाळाबाह्य मुले आढळली. ही बाब त्यांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे.आता जिल्ह्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच शाळाबाह्य मुले सापडल्याने संबंधित शिक्षकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. (शहर वार्ताहर)