शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीद्वारे फिशिंग करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 17:11 IST

Fishing Ratnagiri : अवैधरित्या एलईडी फिशिंग करणाऱ्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. रत्नागिरी तालुक्यातील भगवती बंदरापासून ९ वावात या नौका एलईडी लाईट लावून मासेमारी करीत होत्या. या कारवाईत मत्स्य विभागाने ८ लाख रूपयांचे साहित्य जप्त केले आहे.

ठळक मुद्देएलईडीद्वारे फिशिंग करणाऱ्या दोन नौकांवर कारवाईसुमारे ८ लाख रूपये किंमतीचे साहित्य जप्त

रत्नागिरी : अवैधरित्या एलईडी फिशिंग करणाऱ्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. रत्नागिरी तालुक्यातील भगवती बंदरापासून ९ वावात या नौका एलईडी लाईट लावून मासेमारी करीत होत्या. या कारवाईत मत्स्य विभागाने ८ लाख रूपयांचे साहित्य जप्त केले आहे.एलईडी फिशिंगला बंदी असताना चोरट्या पद्धतीने एलईडी फिशिंग सुरू आहे. त्या विरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापूर्वी एलईडी फिशिंग विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी आवाज उठविला होता. हर्णै परिसरात मच्छिमारांनी आंदोलनळभ केले होते. एलईडी फिशिंग बंद व्हावी यासाठी आमदार योगेश कदम यांनीही आवाज उठविला. त्यानंतर अवैधरित्या एलईडी फिशिंग करणाऱ्यांविरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही चोरट्या पद्धतीने मासेमारी सुरूच आहे.सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाची गस्तीनौका रात्रगस्तीसाठी समुद्रात गेली होती. यावेळी भगवती बंदरापासून ९ वावात दोन नौका बेकायदेशीररित्या एलईडी फिशिंग करीत होत्या. यावेळी गस्तीनौकेवरील पथकाने त्या दोन नौकांच्या दिशेने जावून बेकायदेशीररित्या सुरू असलेली मासेमारी तत्काळ थांबवली. तसेच तंजीला मर्यम, सफिना वाहिद या दोन नौकांवर कारवाई केली आहे.या कारवाईत मत्स्य विभागाने २८ एलईडी लाईट, ३ जनरेटर असे मिळून सुमारे ८ लाख रूपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. या दोन्ही नौका मिरकरवाडा बंदरामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी