शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

By admin | Updated: July 15, 2017 15:26 IST

माहिती देण्यास टाळाटाळ

आॅनलाईन लोकमतदेवरूख (जि. रत्नागिरी), दि. १५ : कोल्हापूरकडे विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकचालकांवर देवरूख तहसील कार्यालयाने कारवाइ केली आहे.

देवरूखातील सावरकर चौक येथे काल (गुरुवारी) ही कारवाई करण्यात आली. देवरूखचे तहसीलदार संदीप कदम यांना अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांना घेत सावरकर चौक येथे सापळा रचला. यावेळी चिपळूणहून विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रक आढळून आले. यामध्ये (एमएच-०९ क्यू-५५१३), (एमएच-०४ पी ४८५६) व (एमएच-४३ इ ७१९६) या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या तहसील कार्यालयाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

पाण्यात पडून तरूणाचा मृत्यू

राजापूर : बंधाऱ्यावर मासे पकडताना चक्कर आल्याने अविनाश अरुण घाडी (२२) याचा मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील तळवडे गावी आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता घडली. तळवडे येथील सिमेंट बंधाऱ्यामध्ये काही मित्रांसमवेत अरुण हा मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला चक्कर आल्याने तो पाण्यात पडला. यावेळी बंधाऱ्यात पाणी जास्त असल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, या वर्षातील बुडून मृत्यू होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

भरणेत पुलावरुन पडून कामगार गंभीर जखमी

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला आहे. महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलावरून शुक्रवारी सकाळी ९च्या सुमारास कामगार खाली पडून गंभीर जखमी झाला. हेजापसिंग जगदीश मित्तल (५२) असे त्याचे नाव आहे. तो कोठे राहतो हे मात्र समजू शकलेले नाही. तोल गेल्याने तो खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा हात व पाय मोडला आहे. जोरदार मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला आहे. घटना घडताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.महामार्गावरील जगबुडी नदीवर चौपदरीकरणासाठी हा पूल बांधण्यात आहे. याच पुलावर हेजापसिंग काम करीत होता. पुलावर उभे राहण्यासाठी स्ट्रक्चर करण्यात आले होते, त्याचा एक भाग खाली गेल्याने तो सुमारे ४० फूट अंतरावर खाली कातळावर कोसळला. या घटनेने त्याचे सहकारी कामगारही हादरले. यावेळी तेथे खाली असलेले व रस्त्यावरील पादचाऱ्यांनी त्याला उचलून बाजूला ठेवले. त्यानंतर जवळच्याच रुग्णालयात हलवले.