शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागात १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 5, 2016 00:03 IST

एस. टी. महामंडळ : ४७ जणांचे निलंबन, ७५ बडतर्फ

रत्नागिरी : पैशांचा अपहार, प्रवाशांशी उध्दट वर्तन तसेच सततची गैरहजेरी यामुळे वर्षभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील एकूण १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत ३६ वाहक, ११ चालक निलंबित करण्यात आले, तर ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होत असल्याने एस. टी.ला मिळणारे दररोजचे उत्पन्न सरासरी ६१ लाख ९ हजार रुपये इतके आहे. प्रवाशांची वाहतूक करताना अनेकवेळा प्रवाशांशी उध्दटपणे वाद घालणे, गैरवर्तन करणे, थांब्यावर प्रवासी थांबलेले असताना गाडीत जागा असूनही पुढे नेवून गाडी थांबवणे, प्रवाशांना न घेता गाडी रिकामी घेऊन जाणे आदी विविध कारणांमुळे जिल्ह्यातील एकूण ११ चालकांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांसाठी चालकांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड, राजापूर आगारातील प्रत्येकी एक व रत्नागिरी आगारातील ७ चालक निलंबित करण्यात आले.तिकीट व पैशांच्या देवाणघेवाणीमुळे झालेल्या अपहारामध्ये जिल्ह्यातील ३६ वाहकांवर कारवाई करण्यात आली. वाहकांनाही ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मंडणगड ३, दापोली १, खेड ७, चिपळूण ९, गुहागर २, देवरूख २, रत्नागिरी ५, राजापूर ४ व लांजा आगारातील ३ वाहकांचा यात समावेश आहे. सातत्याने कामावर गैरहजर राहून कामाचा खोळंबा करणाऱ्या व प्रशासनाला त्रास देणाऱ्या एकूण ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चालक ४१, वाहक २४, कार्यशाळा कर्मचारी ५ व प्रशासकीय कर्मचारी ५ यांचा समावेश आहे. वेळोवेळी समज देऊनही कामात व वर्तणुकीत सुधारणा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून बडतर्फ करण्यात येते. वर्षभरात ७५ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. प्रवाशीभिमुख आणि विनम्र सेवा तसेच निर्धोक वाहतूक यासाठी एस. टी. प्रयत्नशील असून या चौकटीत न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)प्रवासी : सौजन्याने वागायला शिका...एस. टी.चे अनेक कर्मचारी प्रवाशांशी उध्दटपणे वागतात, हेच यावरून दिसून आले आहे. एकीकडे एस. टी.चे भारमान घटत असताना दुसरीकडे एस. टी. कर्मचाऱ्यांनाही त्याच्याशी काही सोयरसुतक नसल्यानेच महामंडळ तोट्यात चालत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.