शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे भरणाऱ्या ठेकेदारांचे ६ कोटी अजूनही थकीतच

By admin | Updated: March 13, 2016 01:04 IST

जिल्हा परिषद : तीन वर्षे उलटून दमडीही नाही

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नादुरुस्त रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी ६ कोटी रुपयांची कामे करण्यात आली होती. तीन वर्षे उलटले तरी अद्यापही या ठेकेदारांना या कामाची दमडीही न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदार रडकुंडीला आले आहेत. जिल्ह्याच्या शहरी भागातील रस्ते चकाचक दिसत असले, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती त्याउलट आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता ग्रामीण भाग डोंगराळ व दुर्गम आहे. ग्रामीण भागातील रस्ते वाईट स्थितीत आहेत. सन २०१२ पूर्वीच्या पावसाळ्यामध्ये आलेल्या पुरामुळे रस्ते, साकव उखडले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणाच्या दृष्टीने फारच त्रासदायक ठरत होते. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने आज या रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडकच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षात खेडी मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम करण्यात आले. मात्र, तरीही ग्रामीण भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक गावांमध्ये एस. टी. बस नेण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच जनतेचेही हाल झाले होते. त्यासाठी रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण होणे आवश्यक होते.दरम्यान, पूरग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शासनस्तरावर मंत्र्यांशी चर्चाही केली होती. त्यानंतर या रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला १७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीवरुन जोरदार राजकारण जिल्हा परिषदेत सुरु होते. त्यात बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत आले होते. अखेर या निधीतून ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची डांबरीकरण व खडीकरणाची कामे करण्यात आली होती. सन २०१२पूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली होती. या रस्त्यांचे खड्डे भरण्याची कामे अ गटातून घेण्यात आली होती. या रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली होती. सुमारे ६ कोटी रुपयांची रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे ठेकेदारांनी केली होती.त्यावेळी रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येत होता. त्यामुळे ही कामे करण्यास जिल्ह्यातील ठेकेदार पुढे सरसावले होते. ग्रामीण भागातील खड्डे भरण्याची कामे पूर्ण केल्यानंतर ठेकेदारांना त्या कामाचे पैसे वेळेवर मिळणे आवश्यक होते. मात्र, शासनाने या कामांचे पैसे अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे ठेकेदारांनी या कामांचे पैसे मिळण्यासाठी अनेकदा शासनाला लेखी निवेदनेही दिली.तरीही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे हे ठेकेदार गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. तरीही त्यांना अद्याप ६ कोटी रुपयांपैकी दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे आजही जिल्हा परिषद ठेकेदारांचे ६ कोटी रुपये देणे लागते.अधिकाऱ्यांची कसरत : पैसे देण्यासाठी शासनाकडून चालढकलदोन वर्षापूर्वी पुरामध्ये हानी झालेल्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी शासनाने जिल्हा परिषदेला १७ कोटी ५० लाख रुपये दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जिल्हा परिषदेला दिला. मात्र, तीन वर्षापूर्वीचे ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी शासनाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठेकेदारांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यांची दुरवस्थाजिल्हा परिषदेची कामे त्वरित करणाऱ्या ठेकेदारांना बिलांसाठी तीन वर्षे झगडावे लागत असल्याने ठेकेदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.