शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या समुद्रात पोहायला गेलेल्या पुण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू 

By अरुण आडिवरेकर | Updated: December 11, 2023 10:47 IST

या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना देण्यात आली आहे.

दापोली : तालुक्यातील कर्दे येथील समुद्रकिनार्‍यावर पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४:३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दशरथ जगदीश यादव (४०, रा. घोरपडे पेठ, वेगा सेंटर समोर, शंकरशेठ रोड स्वारगेट पुणे) असे त्यांचे नाव आहे. समुद्रस्नान करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

या दुर्दैवी घटनेची माहिती किरण कैलास निवंगुने (रा. पुणे) यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली आहे. पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमधील दशरथ यादव हे बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. ही घटना कळताच स्थानिकांनीही त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

पुणे परिसरातील एकूण चार मित्र पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. या घटनेत मृत्यू झालेले दशरथ यादव हे अविवाहित असून, पुणे येथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांचे नातेवाईक दापोलीत दाखल झाल्यावर विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.  या घटनेची नोंद रविवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.