शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी वरून सावंतवाडीकडे येणाऱ्या शिक्षकाचा बसमध्येच मृत्यू, कणकवली फोडा दरम्यान हृदयविकाराचा झटका

By अनंत खं.जाधव | Updated: January 18, 2023 20:07 IST

मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील असलेले व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे येथील प्राथमिक शाळेत कार्यरत

सावंतवाडी :

मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील असलेले व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे (५३) हा परभणी हून सावंतवाडी कडे येत असतनाच कणकवली तालुक्यातील फोडा येथे गोवा बसमध्ये  हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

हरिभाऊ घोगरे तीन वर्षांपासून सरमळे शाळेत कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी यापुर्वी डेगवे शाळेत ही सेवा बजावली. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी घेऊन ते शनिवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कान्हा या आपल्या गावी गेले होते. आपल्या गावाकडून ते मंगळवारी रात्री कोल्हापूरपर्यंत आले होते.

तर बुधवारी सकाळी मिरज – पणजी या कदंबा गाडीने सावंतवाडीत येत होते. ही बस फोंड्यादरम्यान आली असता हरिभाऊ घोगरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हा परिषदेचे प्राथमिक म शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, विस्तार अधिकारी साळगावकर, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, म ल देसाई, नारायण नाईक यांच्यासह त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तात्काळ फोंडा येथे धाव घेतली. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेने त्यांच्या गावी नेण्यात आले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील भाऊ, बहीण असा परिवार आहे.