लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नॅशनल क्राईम रेकाॅर्डस ब्युरोच्या २०२० अहवालानुसार जिल्ह्यातील १५ मुलांवर मारामारी, चोरी व असे विविध प्रकारांतील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत ७४ मुली व १५ मुलगे असे एकूण ८९ जण बेपत्ता झाले हाेते. या सर्वांचा शाेध घेण्यात भरोसा सेल कक्षातील पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यात १ भ्रूणहत्याही झाली आहे. ४५ अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून, त्यातील ५ मुलींचे बालविवाह करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
२०२० मध्ये ३ मुलांचे खून
खून ३
बलात्कार १
आत्महत्या १
खुनाचा प्रयत्न ००
भ्रणहत्या १
मारहाण १
अपहरण ८९
अल्पवयीनवर ४५
बलात्कार
बलात्काराचा ००
प्रयत्न
१०० टक्के लागला शाेध
रत्नागिरी जिल्ह्यातून पळून जाण्याचे व फूस लावून जाण्याचे प्रमाण खूप होते. आत्तापर्यंत सर्व पळून गेलेल्यांना भरोसा सेल कक्षाकडून शोधून काढण्यात १०० टक्के यश येत आहे. पळून गेलेल्या अल्पवयींनाना शोधण्यात यश आले आहे.
१५ मुलांवर गुन्हे दाखल
अल्पवयीन मुलेसुद्धा परिस्थितीमुळे मारामारी, चोरी, अत्याचार दुखापत असे विवध प्रकाराचे गुन्हे जिल्ह्यातील गेल्या आठ महिन्यांत १५ मुलांनी अशा प्रकाराचे गुन्हे केले आहेत. अशा सर्व मुलांवर पोलीस दलाकडून कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण बेपत्ता २९
मुले १५
मुली १४