खेड : निवडणूक आयोगाच्या सहाय्यक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे खेड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. तालुक्यात १० ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूकही घेतली जात आहे. दि. २२ रोजी या निवडणुका होत असल्याने तालुक्यातील राजकारण तापले आहे. सुटीचे दिवस वगळता दि़ ७ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. बुधवार, ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करणे, शुक्रवार, १० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, नंतर उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येईल. बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी मतदान होईल. गुरूवार, दि. २३ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. तालुक्यातील राजकीय चित्र पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहे. दयाळ, कुळवंडी, कळबणी खुर्द, सवेणी, ऐनवरे, घेरा रसाळगड, आंबवली, वरवली, बीजघर, कुंभाड, हुंबरी, नांदिवली, शिरगाव, शेल्डी, गुणदे, शिव बुद्रुक, आष्टी, लवेल, दाभिळ, आवाशी, बोरज, अंजनी, सात्वीणगाव, लोटे, तळवटपाली, तळवट खेड, मुसाड, वावेतर्फ खेड, कुरवळ जावळी, पोसरे बुद्रुक, धामणंद, साखर, चोरवणे, सार्पिली, काडवली, आंबडस, धामणदिवी, सोनगाव, चिरणी, हेदली, मुरडे, आंबये, चाकाळे, शिवतर, जामगे, चिंचघर, तिसे, साखरोली, पोयनार, फुरूस, सुकदर, धामणी, आयनी भिलारे, घेरापालगड, भरणे, वेरळ, शिरवली, उधळे बुद्रुक, कसबा नातू, तुळशी खुर्द, बोरघर, खवटी, कशेडी, तळे, कुडोशी, मोहाने, मांडवे, जैतापूर, किंजळे तर्फ नातू, शिंगरी, मुंबके, कर्जी, कोरेगाव, शेरवल, तुंभाड, मोरवंडे, पन्हाळजे, होडखाड, माणी, मिर्ले, मेटे, कोतवली, कासई, कावळे, केळणे, भडगाव, करटेल आदी ८७ ग्रामपंचायतींचा सामावेश आहे़सुसेरी प्रभाग नं़ १, वडगाव प्रभाग नं़ २, रजवेल प्रभाग नं़ १, चौगुले मोहल्ला प्रभाग नं़ २ व ३, सवणस खुर्द प्रभाग नं़ १, सवणस-मूळगाव प्रभाग क्र. २, व ३, अलसुरे प्रभाग नं़. २, खोपी प्रभाग नं. २ आस्तान प्रभाग नं. १ व ३, बहिरवली प्रभाग नं. २ या दहा ग्रामपंचयातींमध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. (वार्ताहर)
खेडमध्ये ८७ ग्रामपंचायतीच्या निवडणूक
By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST