शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रेल्वे प्रवाशांचे ८० लाख लंपास

By admin | Updated: March 24, 2016 23:38 IST

तोतया पोलीस: केरळच्या ज्वेलर्सकडून पोलिसात तक्रार

रत्नागिरी : पनवेलमधून केरळमध्ये ओखा एक्सप्रेसने जाणाऱ्या दोघा प्रवाशांकडून ८0 लाख रूपये लुटण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी रत्नागिरी परिसरात घडला आहे. तुमच्याकडे आरक्षण नसताना आरक्षित बोगीत कसे बसलात, असे सांगत गाडीतून खाली उतरवले व साहेबांना भेटावयाचे आहे, असे सांगत चोरट्यांनी त्यांना स्वीफ्ट गाडीने काही अंतरावर नेले. त्यांच्याकडील ८० लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्या दोघांनाही तेथेच सोडून चोरटे स्वीफ्टमधून पसार झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेबाबत केरळमधून गुरुवारी सायंकाळी रत्नागिरीत आलेल्या जितेंद्र हिंदूराव पवार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार पवार यांचे वडरगा, जिल्हा कालिकत, केरळ याठिकाणी बॉम्बे ज्वेलर्स हे दुकान आहे. त्यांनी व सोने गाळणारा मित्र बाबासाहेब सनगर या दोघांनी त्यांच्याकडील कामगार श्रीराम शेंडगे व विकास शिंदे या दोघांकडे २३७६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड मुंबई येथे विकण्यासाठी दिली होती. ती लगड या दोघांनीही मुंबईत विकली. त्याचे ६० लाख रुपये त्यांच्याकडे होते. तसेच मुंबईतील काही ज्वेलर्सनी आगाऊ म्हणून दिलेले २० लाख रुपये त्यांच्याजवळ होते. एकूण ८० लाख रोख रक्कम घेऊन दोघेही बुधवारी रात्री पनवेलमध्ये आले. ते ओखा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या एस ७ या आरक्षित बोगीत बसून केरळला निघाले होते. बुधवारी पहाटे ते रत्नागिरीत आले असता दोघेजण त्यांच्याजवळ आले. आपण पोलीस असल्याची बतावणी करत सामान्य बोगीचे तिकिट असताना आरक्षित बोगीत का बसलात, या बोगीतून उतरावे लागेल, साहेबांना भेटावे लागेल, असे सांगत त्यांनी या दोघांनाही गाडीतून उतरविले व स्वीफ्ट कारमधून त्यांना काही अंतरावर नेत त्यांचे हात रुमालाने बांधले व त्यांच्याकडील ८० लाख रक्कम जबरीने चोरून नेली. या ८० लाखांच्या रोख रकमेबरोबरच ६ हजार रुपये किंमतीचे ४ मोबाईल, रोख ४२०० रुपये असलेली दोन पाकिटे व कपडेही चोरट्यांनी लंपास केले आहेत. बुधवारच्या या प्रकाराची तक्रार जितेंद्र पवार यांनी गुरूवारी सायंकाळी दिली आहे. याप्रकरणी रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर अधिक तपास करीत आहेत. एवढी मोठी रक्कम रेल्वेने आणणे धोकादायक असताना ती का आणली गेली, खरोखरच एवढी रक्कम चोरीला गेली का? याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)