शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी कोकणात ७२ विशेष रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड/रत्नागिरी आणि पनवेल-सावंतवाडी रोड/रत्नागिरीदरम्यान ७२ विशेष ...

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड/रत्नागिरी आणि पनवेल-सावंतवाडी रोड/रत्नागिरीदरम्यान ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रात्री १२.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याचदिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून विशेष गाडी दररोज ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दुपारी २.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्यादिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री १०.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी आणि गुरुवारी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्यादिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबणार आहेत.

पनवेल-सावंतवाडी रोड त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या) पनवेल येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी सावंतवाडीला रात्री ८ वाजता पोहोचेल. त्री-साप्ताहिक विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ८.४५ वाजता सुटून पनवेलला दुसऱ्यादिवशी सकाळी ७.१० वाजता पोहोचेल.

या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.

पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) पनवेल येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी ३.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दर सोमवारी आणि शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्यादिवशी पहाटे ६ वाजता पनवेलला पोहोचेल. या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबणार आहेत.