रत्नागिरी : गेले पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेनाबाधितांचा आकडा १००च्या आत राहिल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. रविवारीही जिल्ह्यात केवळ ७० रुग्ण सापडले आहेत तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. काेराेनातून २० रुग्ण बरे झाले असून, १,२७७ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २,८६३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ३ रुग्ण, दापोलीत ६ रुग्ण, खेडमध्ये ५, गुहागरात १४, चिपळुणात १०, संगमेश्वरात १२, रत्नागिरीत १८, लांजात २ रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले आहेत तर राजापूर तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची एकूण संख्या ७६,९४२ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात दापोली आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण २,३७२ बाधित कोरोनाने दगावले आहेत. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे तर आतापर्यंत ७३,२९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२६ टक्के आहे.