शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

७ हजार लोकांना मिळते गढूळ पाणी

By admin | Updated: July 16, 2015 23:30 IST

चिपळूण तालुका : आरोग्याचा प्रश्न उभा

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पेढे पर्शुराम गावातील सुमारे ७ हजार लोक व विद्यार्थ्यांना गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथील लोकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पेढे-पर्शुराम गावामध्ये सुमारे ७ हजार लोक आणि विद्यार्थीवर्ग आहे. त्यांना करण्यात येणारा पाणी पुरवठा हा गढूळ असल्याने येथील लोक व विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांना शुध्द पाणी पुरवठ्याबाबत लोटे औद्योगिक वसाहत आणि जिल्हा परिषदेकडे मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य विश्वास सुर्वे यांनी सांगितले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून पेढे पर्शुराम गावासाठी नळपाणी योजना मंजूर झाली आहे. ही योजना निकषात बसत नसल्याचे कारण पुढे आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी त्या योजनेला बे्रक दिला आहे. त्यामुळे सदस्य सुर्वे यांनी ही योजना निकषात बसत नसेल तर इतर योजना निकषात कशा बसल्या, असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी कामे झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांचीही चौकशीची मागणी करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितले. ग्रामपंचायतींची घरपट्टी वसूली बंद असल्याने पेढे पर्शुराम ग्रामपंचायतीकडे पाणी शुध्दिकरणासाठी पावडर खरेदी करण्यास पैसे नसल्याने डास निर्मुलन आणि पाणी शुध्दिकरणाची समस्या वाढली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सुर्वे यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)स्थायी समितीच्या सभेत पेढे पर्शुराम होणाऱ्या गढूळ पाण्याच्या प्रश्नावरुन जोरदार चर्चा झाली होती. सभेत पेढे पर्शुराम गावाला टँकरने पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे ७ हजार लोकवस्ती असलेल्या गावाला किती दिवस टँकरने पाणी पुरवठा करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.