शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कोरेगाव येथे ७ घरफोड्या

By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST

लाखोंचा ऐवज लंपास : रोख रकमेसह दागिनेही चोरीस; घरमालक मुंबईचे

खेड : तालुक्यातील कोरेगाव येथील विठ्ठलवाडी आणि गणेशनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान तब्बल ७ बंद घरे फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घरांचे मालक मुंबईत नोकरीनिमित्त राहतात. चोरट्यांना पकडण्यासाठी रत्नागिरीहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. चोरटे हे कोरेगाव परिसरातील तसेच तालुक्यातील माहीतगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कोरेगावचे पोलीसपाटील मोरे यांनी पोलिसांत ही खबर दिली. कोरेगाव विठ्ठलवाडी येथील ३ बंद घरे आणि गणेशनगरमधील ४ बंद घरे फोडण्यात आली़ विजया बाळकृष्ण मोरे यांच्या घरातील कपाट फोडून त्यातील ४ हजार ५०० रुपये रोकड लांबवली आहे, तर नीलेश मनोहर मोरे यांच्या बंद घरातील २ लोखंडी कपाटे फोडण्यात आली आहेत़ त्यातील एका कपाटातील १ हजार रुपये रोकड लंपास केली आहे. ही दोन्ही घरे मागील बाजूच्या दाराचे कडी कोयंडे काढून फोडली आहेत.श्रीधर गुणाजी सावंत यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडण्यात आले आहे. मात्र, यातील मौल्यवान अशी कोणतीही वस्तू नव्हती. दत्ताराम रामचंद्र कोकाटे यांच्या घराच्या दर्शनी भागाचे कुलुप तोडण्यात आले आहे. येथूनच चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. कपाटे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात या चोरट्यांना यश आले नाही. शशिकांत राजाराम मोरे यांच्या बंद घरातील लोखंडी कपाटे फोडण्यात आली. लक्ष्मण श्रीपत मोरे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ६ ग्रॅम सोने, ३ अंगठ्या आणि चेनमधील सोन्याचे पान (लॉकेट) तसेच लोखंडी कपाटातील ६ हजार ५०० रुपये रोकड आणि पेटीतील १२ हजार रोकड गायब झाली आहे़ कपाटात ठेवलेले ७ ते ८ चांदीच्या वस्तूही चोरीस गेल्या आहेत. शाहू शिवराम मोरे यांच्या बंद घरातील लोखंडी कपाट फोडण्यात आली आहेत. तालुक्यातील सुसेरी गावातही अशा प्रकारची चोरी झाली असून, यावेळी त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.दरम्यान, खेड पोलीस स्थानकातील परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पांडे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पवार आणि पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रत्नागिरीहून श्वानपथक मागविण्यात आले असून, सायंकाळी उशिरापर्यंत ते खेडमध्ये दाखल होणार आहे. (प्रतिनिधी) चोरी कितीची ?जेथे चोऱ्या झाल्या त्या बंद घराचे मालक मुंबईत वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे चोरीस गेलेल्या मालमत्तेची शहानिशा होऊ शकली नाही. पोलिसांनी या मालकांशी संपर्क साधला असून, रात्रीपर्यंत ते येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़पोलिसांसमोर आव्हानतालुक्यात तब्बल ७ चोऱ्या झाल्याने पोलिसांसमोरचे आव्हान आणखी एकदम गंभीर बनले आहे. अगोदरच्या चोऱ्यांचा तपास लावताना पोलिसांच्या नाकीनऊ आले असतानाच आता एकाच गावातील या चोरीच्या सत्रामुळे अवघ्या तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.