शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

६९ हजार ग्राहकांनी थकविले १२ कोटी

By admin | Updated: August 15, 2016 00:23 IST

कांचन आजनाळकर : महावितरणचे पथक पुन्हा सक्रिय होणार

रत्नागिरी : जिल्ह््यातील ६९ हजार १८८ ग्राहकांनी १२ कोटी ४३ लाख ६३ हजार रूपयांची वीजबिले न भरल्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. मार्च अखेर केवळ लाखात असलेली थकबाकी आता कोट्यवधीत पोहोचली आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पथक पुन्हा सक्रीय होणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कांचन आजनाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महावितरण कंपनीकडे अनेक ग्राहकांची थकबाकी आहे. यासाठी आता महावितरण कंपनी कडक पावले उचलणार असल्याचे आजनाळकर म्हणाले. चिपळूण विभागात १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार तर रत्नागिरी विभागातील ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात तर सर्वात कमी थकबाकी खेड विभागात आहे. जिल्ह््यातील एकूण ५४ हजार ४२६ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ६० लाख ८९ हजार, वाणिज्य विभागातील ७ हजार ९२६ ग्राहकांकडे २ कोटी ७९ लाख ३ हजार, १३८६ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे. ३ हजार १३८ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे २० लाख ८२ हजार, ५१५ सार्वजनिक पथदीपांची ५६ लाख १ हजार तर अन्य ९६३ ग्राहकांकडे ३० लाख ९४ हजारांची थकबाकी आहे. चिपळूण विभागातील १५ हजार २५४ ग्राहकांकडे १ कोटी ९६ लाख रूपये थकबाकी आहे. २१४५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८१ लाख ४२ हजार तर औद्योगिकच्या ३४५ ग्राहकांकडे ३५ लाख ५७ हजार, कृषीच्या १२४३ ग्राहकांकडे ७ लाख १ हजार, २०९ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २२ लाख ८८ हजार, ५१ सार्वजनिक पथदीपांचे ३ लाख ७ हजार तर १८८ अन्य ग्राहकांकडे ७ लाख १५ हजाराची थकबाकी आहे. एकूण १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १५ हजार ४४ ग्राहकांकडे १ कोटी ७५ लाख ४९ हजार, २०९५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ७२ लाख ३३ हजार, ३६९ औद्योगिक ग्राहकांकडे ४६ लाख १ हजार, कृषीपंपाच्या ६१८ ग्राहकांकडे ५ लाख ९८ हजार, २१९ सार्वजनिक पथदीपांचे १९ लाख १ हजार, ३४७ सार्वजनिक पथदीपांचे ४५ लाख ६४ हजार तर इतर २९९ ग्राहकांकडे ९ लाख ९३ हजारांची थकबाकी आहे. एकूण १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार रूपयांची थकबाकी आहे. रत्नागिरी विभागातील २४ हजार १२८ ग्राहकांकडे २ कोटी ८८ लाख ४७ हजार, ३६८६ वाणिज्यिक ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख २९ हजार, ६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ४१ लाख १९ हजार, कृषीपंपाच्या १ हजार २७७ ग्राहकांकडे ७ लाख ८३ हजार, ४०६ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ३१ लाख २५ हजार, ११७ सार्वजनिक पथदीपांचे ७ लाख ३१ हजार तर इतर ४७६ ग्राहकांकडे १३ लाख ८६ हजार मिळून एकूण ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेकजण हे मुंबई तसेच अन्य शहरात नोकरी व्यवसायासाठी स्थायिक आहेत. गणेशोत्सवासाठी ही मंडळी आवर्जून गावी परततात. या कालावधीत महावितरणने थकबाकी वसुलीसाठी पथक तयार केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात येणार आहे. महावितरणला सहकार्य करणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे आजनाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)