शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

पाच जागांसाठी ६५ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 28, 2014 00:23 IST

एकाच दिवशी विक्रमी ५९ अर्ज : चारही प्रमुख पक्षांना उमेदवार सापडले

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी आज, शनिवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात एकूण ४१ उमेदवारांचे विक्रमी ५९ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. त्यात दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज सादर केले. दापोलीतून अजित तांबे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया), आदम अब्दुल चोगले (बहुजन मुक्ती मोर्चा), सूर्यकांत दळवी (शिवसेना), वैभव खेडेकर (मनसे), संजय कदम (राष्ट्रवादी), अ‍ॅड. सुजित झिमण (काँग्रेस), किशोर देसाई (अपक्ष आणि काँग्रेस), ज्ञानदेव खांबे (बसपा), सुनील खेडेकर (अपक्ष), प्रविण कोलगे (शेतकरी कामगार पक्ष), प्रदीप गंगावणे या बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुहागरात सुरेश गमरे (बसपा), विजय असगोलकर (काँग्रेस), विजयकुमार भोसले (शिवसेना), भास्कर जाधव (राष्ट्रवादी) या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. चिपळुणात अनंत विश्राम जाधव (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया - आठवले गट), लियाकत शाह (अपक्ष), अशोक जाधव (काँग्रेस), रश्मी कदम (काँग्रेस), माधव गवळी (भाजप), यशवंत तांबे (रिब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कांबळे गट), गोपीनाथ झेपले (अपक्ष), उमेश पवार (बहुजन मुक्ती पार्टी), संतोष गुरव (अपक्ष) या नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. रत्नागिरीतून उदय सामंत (शिवसेना), दिनेश पवार (बसप), संदीप गावडे (अपक्ष), नंदकुमार मोहिते (बहुजन विकास आघाडी), रमेश कीर (काँग्रेस), बशीर मुतुर्जा (राष्ट्रवादी), उदय सावंत (अपक्ष), मनीष तळेकर (अपक्ष), प्रवीण जाधव (अपक्ष) आदी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.राजापुरातून राजेंद्र देसाई, अजित यशवंतराव (राष्ट्रवादी), संजय यादवराव (भाजप), रुपेश विजय गांगण(भाजप), संदीप सखाराम कांबळे (आरपीआय), गणपत रामचंद्र जाधव (अपक्ष) या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातून ६५ उमेदवारांचे १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत.या सर्व अर्जाची छाननी आता सोमवारी (दि. २९) होणार आहे. (प्रतिनिधी) दापोली राष्ट्रवादीत बंडखोरी?दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय कदम यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, येथील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार असताना त्यांनी काँग्रेसतर्फेही अर्ज केला आहे. ते आपला अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.विक्रमी अर्जएकाच दिवशी ५९ अर्ज दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. यादी जाहीर होण्यात झालेला विलंब आणि युती-आघाडीत झालेले वाद यामुळे शेवटच्या क्षणी सर्वपक्षीयांचे अर्ज दाखल झाले.