शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

६० सुरक्षारक्षक अखेर पुन्हा सेवेत

By admin | Updated: February 23, 2016 00:33 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा : राजन साळवींच्या शिष्टाईला यश

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंंधुदुर्गमध्ये कोकण सुरक्षा मंडळांतर्गत महापारेषण खात्यात सेवा देणाऱ्या ६० सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे सेवेतून कमी करण्यात आल्यानंतर आमदार राजन साळवी यांना कामगार मंत्री प्रकाश मेहता व सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांचेकडे कामगारांची सातत्यपूर्ण बाजू मांडल्यानंतर या सर्व ६० सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. १५ ते २० वर्षांपासून सेवा देणाऱ्या या सुरक्षारक्षकांना शैक्षणिक वा शारीरिक स्वरुपाची अट लागू पडत नव्हती. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार या सुरक्षा रक्षकांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होताना किमान ८वी परीक्षा उत्तीर्णची अनाकलनीय अट घालणेत आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे सुरक्षारक्षक हे बहुतांशी स्थानिक, ग्रामीण भागातील व कमी शिक्षण झालेले असून, त्यांचे संपूर्ण कुटूंब या सेवेतून मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून आहे. अशा रत्नागिरी-सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० सुरक्षारक्षकांना या शासन निर्णयाचा फटका बसल्याने त्यांना दि. २५ नोव्हेंबर २०१५ रोजी या सुरक्षारक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. शासन निर्णयामुळे प्रभावित झालेल्या रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील या सुरक्षारक्षकांनी आपली ही समस्या साळवी यांच्या दफ्तरी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार साळवींनी नागपूर येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळी राज्याचे कामगार, गृहनिर्माण व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते व शासन निर्णयामुळे कोकणासहित राज्यातील अनेक सुरक्षारक्षक देशोधडीला लागणार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मेहता यांनी तातडीने स्वीय सचिव अनिल लाकसवार यांच्या माध्यमातून रत्नागिरीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी संपर्क साधला व आपण अनेक वर्षे सेवा बजावित असलेल्या सुरक्षारक्षकांबाबत लवकरच सुधारीत आदेश पारीत करणार असल्याचे स्पष्ट केले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या माध्यमातून सेवेतून मुक्त केलेल्या ६० सुरक्षारक्षकांना आता कोकण सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून वाढीव मुदत देऊन सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्यात आले आहे. या सुरक्षारक्षकांना कोकण सुरक्षा मंडळाच्या मार्फत कायमची सेवा देणेच्या अनुषंगाने शासनस्तरावर प्रक्रिया चालू असून, नजीकच्या काळात या सर्व रक्षकांना सेवेत कायम ठेवले जाईल. (प्रतिनिधी) प्रश्न मार्गी : कर्मचाऱ्यांचा नि:श्वास रत्नागिरी जिल्ह््यातील खेड -लोटे, संगमेश्वर - आरवली, चिपळूण -दस्तुरी, रत्नागिरी - पावस, निवळी, कुवारबांव, राजापूर - ओणी तसेच सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली, कणकवली, कुडाळ, तळेबाजार व खारेपाटण येथील कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक कार्यरत होते.