शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंध, अपंग प्रवाशांसाठी ५७६ काडसचे वाटप

By admin | Updated: December 19, 2014 00:28 IST

योजनेमध्ये प्रवाशांना ७५ टक्के सवलत दिली जाते. विद्यार्थी सवलत पास योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अडरे : प्रवाशांसाठी विविध योजना राबवून तोट्यात चाललेल्या एस. टी.चे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एस. टी. महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यानुषंगाने चिपळूण आगाराच्या वतीने अपंग व अंध प्रवाशांसाठी ५७६ काडर््सचे वाटप करण्यात आले आहे. योजनेमध्ये प्रवाशांना ७५ टक्के सवलत दिली जाते. विद्यार्थी सवलत पास योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांसाठी यात्रा, सण, उत्सव, लग्न समारंभ अशा विविध प्रसंगी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी सवलतीच्या दरात नैमित्तिक कराराने एस. टी.च्या बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यात चार व सहा दिवसांसाठी हंगामानुसार विहीत केलेल्या दराप्रमाणे गाड्या नैमित्तिक कराराने एस. टी.च्या गाड्या पुरवण्यात येतात. याशिवाय आवडेल तेथे प्रवास पास योजना सुरु करण्यात आली आहे. वार्षिक कार्ड योजनाही १८ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या कार्डधारकांना लागू करण्यात आली आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर पास योजनाही सुरु करण्यात आली आहे. एस. टी.च्या उत्पन्नात अधिकाधिक भर पडण्याच्या दृष्टीने एस. टी. महामंडळाच्या सर्वच आगारांतून विविध योजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. (वार्ताहर)